nashikroad jail.png 
नाशिक

COVID-19 : 'या' कारागृहाला २५ हजार मास्कची ऑर्डर..बंदी बांधव लागले कामाला!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला २५ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. खासगी संस्थेने ही ऑर्डर दिली असून कारागृह प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

गरजूंना मास्क उपलब्ध व्हावेत म्हणून...

गरजूंना मास्क उपलब्ध व्हावेत म्हणून एका संस्थेने कारागृहाला २५ हजार मास्कची ऑर्डर दिली. बंदी बांधव हे काम करत आहेत. कारागृहात तीन हजार बंदी असून चारशे अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांनाही प्रशासनाने मास्क वाटून ते लावण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे बाजारात मास्कची मोठी टंचाई असल्याने जास्त दराने मास्क विक्री होत आहे.

बाहेरच्या कैद्यांना संबंधित जिल्हा कारागृहातच

कारागृहात तीन हजार कैदी आहेत. कारागृह म्हणजे एक गावच आहे. कोरोनासारख्या विषाणूची लागण एका जरी कैद्याला झाली तरी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. औरंगाबादचे कारागृह उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील कैद्यांचाच स्वीकार सुरु केला आहे. बाहेरच्या कैद्यांना संबंधित जिल्हा कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. नाशिकमधून आलेल्या कैद्यांची प्रथम जिल्हा रुग्णालयात तपासणी होते. मग कारागृहातील कोरोना वार्डात पंधरा दिवस स्वतंत्र ठेवले जाते. 

कोरोना टाळण्यासाठी प्रत्येक बराकीत पत्रके

कैदी व कर्मचा-यांनी कोरोना टाळण्यासाठी काय करावे व करु नये याची प्रत्येक बराकीत पत्रके लावण्यात आली आहेत. बाहेरुन कर्मचारी किंवा अन्य व्यक्तीला कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी साबणाने हात धुवावे लागतात. कारागृहाचे डॉ. सचिन कुमावत, डॉ. ससाणे हे त्यांची आरोग्य तपासणी करतात. प्रत्येक बंदीबांधव, कर्मचारी व अधिका-याचे दररोज तापमान घेतले जात आहे. कैद्यांनी एकाच ठिकाणी थांबू नये म्हणून कामानंतर ग्रंथालयात, कॅरम, व्हॉलीबाल, बुध्दीबळ खेळण्यासाठी पाठवले जात आहे. महापालिकेच्या कर्मचा-यांना बोलावून कारागृहात औषध फवारणी करण्यात आली आहे.

हेही वाचा > माणसातच शोधा आता देव...कारण, 'मंदिर'च बंद!...इतिहासात घडतंय पहिल्यांदाच
जामीनपात्र कच्च्या कैद्यांना त्वरित जामीनावर सोडण्याची विनंती
कारागृहाची क्षमता दीड हजार असताना तीन हजार कैदी झाले आहेत. गर्दी कमी करण्यासाठी जामीनपात्र कच्च्या कैद्यांना त्वरित जामीनावर सोडण्याची विनंती कारागृहाने कोर्टाला केली आहे. कैद्यांना कोर्टात न नेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारा सुनावणी घेतली जात आहे. कैद्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून दररोज सुमारे पाचशे नातेवाईक येतात. करोनामुळे त्यांना तसेच कैद्यांच्या वकिलांना ३१ मार्चपर्यंत येथे बंदी आहे. कैदी आणि कर्मचारी यांना साडेतीन हजार मास्कचे वाटप झाले असून प्रत्येकाला मास्क सक्तीचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT