Sieving of the road esakal
नाशिक

Nashik Road Damage: रस्त्याच्या समस्येने नशिबी रोजचे मरण; खांडेनगर परिसराला विकासाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

सिडको : खांडेनगर परिसर गेल्या ५-६ वर्षात कुठल्याही प्रकारचा विकसित झालेला आहे. मात्र दोन्ही प्रभागांचा भाग असल्यामुळे जवळपास कोणतेही नगरसेवक या भागात शक्यतो फिरकत सुद्धा नाही.

कसलाच विकास निधी उपलब्ध येथे होत नाही. गार्डन किंवा नाना- नानी पार्क येथे अजून तयार झालेला नाही. येथील रस्त्यांपेक्षा खेड्यातील रस्ते बरे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Nashik Road Damage Daily death due to road problem Khandenagar area awaits development)

खांडेनगर परिसरात २०१७ मध्ये नागरिकांनी रस्त्यांचा मुद्दा उचलून धरला होता. त्या वेळी प्रशासनाने तत्काळ पुढील ३ महिन्यात नवीन रस्ते मंजूर करून रस्ते बांधणी सुरू केली होती. मात्र या घटनेला ६ वर्षाचा काळ लोटला गेला.

सध्या खांडेनगर परिसरात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला या सर्वांनाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांमधील जुनी खडी, दगड वर आल्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक झाले आहे.

पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचते. पावसाळ्यानंतर धुळीचे साम्राज्य पसरते. अशा सर्वच बाजूने खांडेनगरचे रस्ते पूर्णतः डॅमेज झालेले असताना स्थानिक नागरिकांना श्वसन विकार होण्यास सुरवात झाली आहे.

त्यामुळे याकडे नाशिक महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून रस्ते दुरुस्ती करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

"खांडेनगर परिसरामध्ये विकासाची वानवा दिसून येते. येथे कोणीही फिरण्यास तयार नाही. नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. दिवाळीनंतर खांडेनगर परिसरातील रस्ते दुरुस्ती मनपा प्रशासनातर्फे झाले नाहीतर आंदोलन करण्यात येईल."

- प्रा. अमोल पाटील, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT