Traffic Rule Break esakal
नाशिक

Nashik Traffic Rules Break : वाहतूक शाखेच्या मोहिमेचा ‘फज्जा’! बेशिस्त वाहनचालक जुमानात कारवाईला

Nashik News : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे गेल्या सोमवारपासून (ता. २२) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Rules Break : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे गेल्या सोमवारपासून (ता. २२) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे. असे असताना, दुसरीकडे बेशिस्त वाहनचालक मात्र बिनधास्तपणे वाहतूक नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची मोहिमेत नेमकी कोणावर कारवाई होते आहे, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे. (Nashik Rules Break traffic department campaign news)

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने अपघाती घटना घडत आहेत. या घटनांमध्ये हकनाक बळीही जात आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर वाहतूक शाखेला विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, ट्रीपलसीट, बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेने उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या चारही वाहतूक विभागात सोमवारपासून (ता. २२) आठवडाभर बेशिस्तांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.

यात, विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ट्रीपल सीट, रिक्षात जादा प्रवासी यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ऑनलाईन इ-चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यातून वाहतूक पोलिसांनी शेकडो बेशिस्तांविरोधात कारवाई करीत लाखोंचे दंडही आकारला आहे. (latest marathi news)

तरीही बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी कमी झालेली नाही. उलट शहरात विनाहेल्मेट, विना सीटबेल्ट, ट्रीपलसीट, राँगसाईड, फ्रंडसिट रिक्षाचालक वाहनचालकांकडून सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेचाच फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

१६९ रिक्षाचालकांना दंड

शहर वाहतूक शाखेच्या चारही विभागांतर्गत विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालकांविरोधात ऑनलाईन इ-चलानदवारे दंड आकारला जात आहे. या मोहिमेत पोलिसांकडून विना- हेल्मेट, सीटबेल्टच्या कारवाईसह बेशिस्त रिक्षाचालकांवर ठराविक वेळेत कारवाई सुरू आहे. फ्रंटसीट, गणवेश नसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या १६९ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात केसेस करीत ८४ हजार ५०० रुपयांचा दंड इ-चलानद्वारे दंड आकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT