runners from nashik won medals in khelo India University Games
runners from nashik won medals in khelo India University Games esakal
नाशिक

नाशिक : नाशिकच्‍या धावपटूंनी पदकांची केली लयलूट

अरुण मलानी

नाशिक : बंगळुरू (Bangalore) येथे पार पडलेल्‍या खेलो इंडिया युनिव्‍हर्सिटी गेम्समध्ये नाशिकच्‍या (Nashik) धावपटूंनी पदकांची लयलूट केली आहे. नाशिकला सराव करणाऱ्या कोमल जगदाळे हिने सुवर्णपदकाला (Gold medal) गवसणी घातली. अजय राठीने रौप्‍य आणि पूनम सोनोने ही धावपटू कांस्‍यपदकाची (Bronze medal) मानकरी ठरली आहे. (Nashik runners won medals)

तिन्‍ही खेळाडू भोसला सैनिकी महाविद्यालय केंद्रातील खेळाडू असून, ते एकलव्‍य अकॅडमीअंतर्गत सराव करतात. या स्‍पर्धेत सहभागी होताना कोमलने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभागी होताना ३ हजार मीटर स्टिपलचेस या गटातून सूवर्णपदक पटकावले. १० मिनिटे १३.४९ सेकंद अशी वेळ नोंदवितांना तिने ही कामगिरी केली आहे. बनारस हिंदू युनिव्‍हर्सिटीची रेबी पाल ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. या गटातून युनिव्‍हर्सिटी ऑफ लखनौची काजल शर्मा हिने कांस्‍यपदक (Bronze medal) पटकावले.

नाशिकला (nashik) सराव करणाऱ्या अजय राठीने लव्‍हली प्रोफेशनल युनिव्‍हर्सिटीकडून सहभागी होताना पाच हजार मीटर पुरुषांच्‍या गटातून रौप्‍यपदक (Silver medal) पटकावले. या गटातून महर्षी दयानंद युनिव्‍हर्सिटीच्‍या लोकेश चौधरीने अव्वल क्रमांकासह सूवर्णपदक (Gold medal) पटकावले. दरम्‍यान नाशिकच्‍या पूनम सोनोने हिने पाच हजार मीटर महिलांच्‍या गटातून धावतांना कांस्‍यपदकाची (Bronze medal) कमाई केली. ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्‍पर्धेत सहभागी झाली होती. या गटातून निकिता राउत हिने सुवर्णपदक (Gold medal) तर भारतीने रौप्यपदक (Silver medal) पटकावले. या खेळाडूंना प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT