Sahil Parakh receiving the man of the match award esakal
नाशिक

U19 IND vs AUS Cricket Match: साहिलच्‍या घणाघाती नाबाद 109 धावा! भारताकडून खेळताना 19 वर्षाआतील गटात ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध कामगिरी

Latest Cricket News : लौकिकास साजेशी फलंदाजी करताना केवळ ७५ चेंडूत १४ चौकार, तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा त्‍याने फटकावल्या. यातून भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील क्रिकेटपटू साहिल पारख याने १९ वर्षेआतील गटातून भारताचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्‍ट्रेलियाविरुद्धच्‍या एक दिवसीय सामन्‍यात साहिलने घणाघाती १०९ धावा करताना संघाच्‍या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्‍याला सामनावीर या किताबाने गौरविले. (Sahil parakh massive 109 not out)

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू, आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. लौकिकास साजेशी फलंदाजी करताना केवळ ७५ चेंडूत १४ चौकार, तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा त्‍याने फटकावल्या. यातून भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

पुदुचेरी येथे एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली जाते आहे. पहिल्या सामन्यात साहिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकार मारून पदार्पण केले. पण लगेचच चार धावांवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्याच सामन्यात त्याची जोरदार भरपाई करताना आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. साहिलने केवळ ४१ चेंडूत अर्धशतक झळकाविले. त्यापुढील फक्त ३४ चेंडूत ५६ धावा फटकावत नाबाद १०९ धावा झळकावल्‍या. साहिलच्या फलंदाजीचा धावसंख्येचा दर (स्ट्राईक रेट) १४५.३३ राहिला. (latest marathi news)

सामन्‍यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीत सर्वबाद १७६ धावा केल्या. महाराष्ट्राच्या किरण चोरमळेच्या गोलंदाजीवर साहिलने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा झेल घेत त्याला १५ धावांवर गुंडाळले. किरणसह समर्थ एन व महम्मद इनाननेही प्रत्येकी २ बळी घेतले.

विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करताना साहिलने रुद्र पटेलसोबत ३ षटकांतच २४ धावांची सलामी दिली. रुद्र १० धावांवर बाद झाला. त्यांनतर साहिलने अभिग्यान कुंडूसह पुढील १९ षटकांत जोरदार नाबाद १५३ ची विजयी भागीदारी केली.

षटकामागे ८ धावांच्या सरासरीने केलेल्या आक्रमक फलंदाजी समोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नांगी टाकली. भारताचा यष्टीरक्षक अभिग्यानने साहीलला साथ देत ५० चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. स्‍पर्धेतील तिसरा एकदिवसीय सामना गुरुवारी (ता.२६) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT