The area has become dry after solving the problem of sewage accumulation in Ganjmal Signal Chowk. esakal
नाशिक

SAKAL Impact :...अखेर गंजमाळ चौकातील सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी

SAKAL Impact : ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदार याने काम तत्काळ पूर्ण केल्याने नागरिकांसह वाहन चालकांनी यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कामामुळे गंजमाळ सिग्नल चौकात सांडपाणी साचण्याची समस्याबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदार याने काम तत्काळ पूर्ण केल्याने नागरिकांसह वाहन चालकांनी यांनी समाधान व्यक्त केले. जीपीओ रोडवरील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत मोठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने मोठा खड्डा खोदण्यात आला होता. ( issue of sewage in Ganjmal Chowk is resolved )

यासह पाण्याच्या पाइपलाइनला गळती लागली होती. तसेच परिसरातून जाणारी ड्रेनची मोठी पाइपलाइन अर्धी तुटल्याने सांडपाणी खड्ड्यातच साचत होते. यामुळे या कामांना निर्धारित वेळेपेक्षा जादा कालावधी लागत होता. दरम्यान खड्ड्यात साचून राहणाऱ्या पाणी आणि सांडपाणी यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळत होते.

यातच कामासाठी हे पाणी मोटारीद्वारे रस्त्यावर सोडले जात असल्याने याचा त्रास देखील स्थानिकांसह वाहनचालक यांना सहन करावा लागत होता. रस्त्यावर सोडणारे हे पाणी थेट गंजमाळ सिग्नल चौकापर्यंत येत होते. तसेच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनमधून गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात होते. (latest marathi news)

या समस्येबाबत 'सकाळ' मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदारांनी कामास गती दिली. रस्त्यावर सोडण्यात येणारे सांडपाणी थांबविण्यात आले. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे पाइपलाइनमधून होणारी पाण्याची गळती देखील व्हॉल्व दुरुस्त करत थांबविण्यात आली.

तसेच ड्रेनेजच्या पाइपलाइची दुरुस्ती करत पाणी थेट चेंबरमध्ये सोडण्यात आले. यामुळे चौकात साचणारे पाणी थांबले असून परिसरातील दुर्गंधी देखील कमी झाली आहे. महापालिका अथवा स्मार्ट सिटी विभागाकडून केली जाणारी कामे नियोजन बद्ध पद्धतीने करण्यात यावी. अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT