online payment  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! बोहनी तर रोखीनेच..!

SAKAL Special : हल्‍ली ऑनलाइनच्‍या जमान्‍यात भल्‍यासकाळी फसलेला खरेदीचा प्रयोग अन्‌ त्‍यामुळे झालेली पंचाईत खदखदून हसविणारी ठरली.

सकाळ वृत्तसेवा

बोहनी तर रोखीनेच..!

कुठलाही सण म्हटला, की खरेदीचा उत्‍साह आलाच. पण हल्‍ली ऑनलाइनच्‍या जमान्‍यात भल्‍यासकाळी फसलेला खरेदीचा प्रयोग अन्‌ त्‍यामुळे झालेली पंचाईत खदखदून हसविणारी ठरली. झालं असं, की गुढीपाडव्‍यानिमित्त खरेदीसाठी सकाळी सकाळी युवकांनी बाजारपेठेकडे पावले वळविली. खरेदी करायच्या वस्‍तू व्‍यावसायिकाला सांगितल्‍या.

त्‍यानुसार त्‍याने वस्‍तू काढून दिल्‍या अन्‌ युवकांनी पैसे अदा करण्यासाठी क्‍यूआर कोड मागितला. त्‍यावर दुकानदार म्‍हणाला, ‘क्यूआर कोड आहे, पण बोहनीची वेळ आहे, त्‍यामुळे रोखीने पैसे द्यायला लागतील.’ पण युवकांकडे रोख पैसे काही नव्‍हते. तरीदेखील खिसे चाचपडून कुठून चुकून पैसे निघतात का, याचा प्रयत्‍न दोघा युवकांनी केला.

पैसे काही भेटले नाही अन्‌ व्‍यावसायिकाला ऑनलाइन पेमेंटसाठीची गळही काही यशस्‍वी झाली नाही. त्‍यामुळे खरेदी न करताच या युवकांना पुन्‍हा परतावे लागले. मात्र या किस्याने व्‍यावसायिक, युवकांना खदखदून हसविले.

(nashik SAKAL Special chalta bolta Bohni is in cash only marathi news)

...अन् उमेदवारी आल्या पावली फिरला माघारी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून जाहीर झालेल्या उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे. उमेदवार घरोघरी, गावोगावी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचारात उमेदवारांना कधी खूप प्रेम मिळते, तर कधी खूप रोषाला सामोर जावे लागते.

तर झाले असे, की जिल्ह्यातील एका मतदारसंघात उमेदवार प्रचार करता-करता गावोगावी फिरत आहे. मात्र, एका गावात गेल्यानंतर तेथील लोकांनी त्यांच्यावर मोठा रोष व्यक्त केला. गत पाच वर्षांत आमच्या गावाला यायला जमलं नाही.

आता कशाला आलात, अशी विचारणा केली. त्यावर उमेदवारासह स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील लोकांचा रोष मोठा असल्याने उमेदवाराला आल्या पावली पुन्हा माघारी फिरावे लागले.(latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT