nashik zp esakal
नाशिक

Sakal Special : चालता... बोलता...! झेडपीत यावे की नाही...

Sakal Special : मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सध्या शासकीय कार्यालयांमध्ये धावपळ सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

झेडपीत यावे की नाही...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सध्या शासकीय कार्यालयांमध्ये धावपळ सुरू आहे. प्राप्त झालेला निधी वेळात खर्च करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत.

जिल्हा परिषदेतही निधी खर्चासाठी सर्व विभागांमध्ये लगबग सुरू आहे. यातच अंदाजपत्रक दाखल करण्याची तयारी विभागात सुरू आहे. यात, जिल्हाभरातून येणाऱ्या सामान्यांची कामे होत नसल्याने त्यांची निराशा होत आहे.

तर झाले असे की, जिल्हा परिषदेत एका विभागात बंद दरवाजाआड बैठक सुरू होती. बैठक असल्याने आत जाण्यास शिपायांकडून मज्जाव केला जात होता. त्या वेळी कार्यालयाबाहेर उभे असलेल्या सामान्यांनी आत जाऊ द्या, अशी विनंती केली. मात्र, त्यांना रोखण्यात आले असता, सामान्यांनी अरे आम्ही लांबून आलो आहे, माझे महत्त्वाचे काम आहे सांगा त्यांना.

त्यावर संबंधितांकडून बैठक आहे सोडू नये, अशा सूचना आहे, असे सांगितले. त्यावर यार, झेडपीत यावे की नाही. कामे तर होत नाही. पूर्ण दिवस वाया जातो, असे सुनावले अन् निघून जाणे त्या सामान्याने पसंत केले. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT