lok sabha election  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! निवडणुकांचा हंगाम

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ वृत्तसेवा

निवडणुकांचा हंगाम

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांमध्ये निवडून येण्यासाठी अनेक जण तयारी करीत आहेत. त्या तयारीचाच एक भाग म्हणून इच्छुक उमेदवारांना झाडावर चढविण्याचेही प्रयत्न होत आहेत.

या प्रयत्नांमध्ये साधल्या जाणाऱ्या स्वार्थातही अनेक प्रकार असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराला तुम्ही किती महान आहात आणि अमुक-तमुक ठिकाणाहून तुम्हाला हार्दिक अधिक मतदान कसे पडेल, याचे गुणगान गायले जात आहे.

इच्छुकाला आपले समर्थक असल्याचे जाणवत असले, तरी प्रत्यक्षात मात्र संबंधित इच्छुक निवडून आला किंवा निवडून नाही आला, तरी त्याचा स्थानिक पातळीवर क्लेम जात असल्याने झाडावर चढविण्याची ट्रिक सध्या चर्चेला आली आहे.

(nashik SAKAL Special chalta bolta Election season marathi news)

मी लोकांच्या मनातला, पण...

धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन दबावतंत्राचा वापर केला. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर करत नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून शिरीषकुमार कोतवाल यांची नियुक्ती केली. नवीन जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. शेवाळे यांनी उमेदवारी न देण्याची खदखद भाषणात व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

त्यावर, नेते बाळासाहेब थोरात यांनीही डॉ. शेवाळे यांना जोर कमी पडल्याचे सांगत सुनावले. त्यानंतरही डॉ. शेवाळे यांनी आपली उमेदवारी सरस असल्याचे सांगत, मी लोकांच्या मनात आहे, मात्र नेत्यांच्या मनात उतरत नसल्याने उमेदवारी मिळविण्यात कमी पडत असल्याची खंत बोलून दाखविली.

मिसळांची मिसळ

‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याचा साधा सरळ अर्थ असा, की शासकीय काम घेऊन गेल्यानंतर ते काम वेळेत होईलच याची खात्री नाही. दुसरे म्हणजे, शासकीय कार्यक्रम वेळेत सुरू होईलच याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. तर झाले असे, की एका शासकीय कार्यक्रमानिमित्त अधिकारी धरणाच्या दिशेने निघतात.

साहेबांना येण्यासाठी थोडा अवधी असल्याचे धरण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येते. लागलीच त्यांची गाडी मिसळवाल्याकडे वळते. अपेक्षेपेक्षा त्यांना जास्त वेळ लागतो, तोपर्यंत साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोचतात. बराच वेळ वाट बघितल्यानंतर धरण खात्याचे अधिकारी येतात.

उशीर होण्याचे कारण त्यांना विचारले तर ‘मिसळ’च्या हॉटेलजवळ ट्रॅफिक जाम झाल्याचे ते सांगतात. तुमच्या नावातच मिसळ असल्यामुळे लोकांनी केली असेल गर्दी म्हणून अधिकारीही त्यांची मस्करी करतात.(latest marathi news)

हे पाहा, आमचे कुटुंब

निवडणूक म्हटले, की डोक्यांची संख्या मोजली जाते. याचाच अर्थ कुठे किती मतदान आहे, हे पाहिले जाते. जेल रोड भागातील असाच एक कार्यकर्ता इच्छुक उमेदवारांना आपल्या कुटुंबाची ओळख करून देताना कुटुंबातील संख्या मात्र सांगण्यास विसरत नाही. संबंधित व्यक्तीच्या घरात १८ सदस्य आहेत. कुटुंबाच्या सदस्यांचा उल्लेख करताना हिशेब सांगितला जात असल्याने संबंधिताची कुटुंब संख्या सध्या चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT