summer sakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! उन्हाचा तडाखा

SAKAL Special : उन्हाचा तडाखा इतका बसतोय की काही विचारायची सोय राहिलेली नाही. एक व्यक्ती शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येते.

सकाळ वृत्तसेवा

उन्हाचा तडाखा

उन्हाचा तडाखा इतका बसतोय की काही विचारायची सोय राहिलेली नाही. एक व्यक्ती शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येते. भर दुपारी आल्याने आधीच घामाघूम झालेला. त्यात गाडी पार्किंगमध्ये लावली. कामकाज आटोपून गाडीजवळ आला तर पार्किंगवाल्यांनी पिवळी पावती समोर धरली.

दोन्ही खिसे चाचपडून त्याचे पैसे दिले आणि गाडी काढली. गाडीवर बसताच एका सेकंदाच्या आत जागेवरून उठून उभा राहिला. चेहऱ्यावरचे हावभाव आता शब्दांत व्यक्त करता न येण्यासारखे झाले होते. उभे राहूनच गाडी सुरू केली.

पण, बसण्याची हिंमत होईना म्हणून उभे राहूनच गाडी चालवायला सुरवात केली. गेटपर्यंत गाडी पोहोचल्यावर भाऊंकडे पाहून सर्वांना वाटले, की हा काय स्टंट मारतोय? पण, भाऊ स्टंट मारत नव्हते; तर शीटच इतके गरम झाले होते, की बसणे शक्यच नव्हते, आता बोला...

(nashik SAKAL Special chalta bolta heat of summer marathi news)

सामजिक दायित्वाचा गवगवा कशासाठी?

स्थानिक स्वराज्य संस्थांना काम करताना स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक दायित्व म्हणून काहीसा हातभार लावावा, असे शासनाकडून सांगितले जाते. यानुसार काही खासगी कंपन्या, संस्था या महापलिका, जिल्हा परिषद, पालिकांना मदत करत असतात. सामाजिक दायित्वातून केलेल्या या मदतीचा संबंधित संस्था, कंपन्या गवगवा करत नाहीत.

परंतु, सध्या हा मदतीबाबत गवगवा सुरू आहे. झाले असे, की ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्डर दिले. काही रुपयांचे असलेल्या फिल्डरसाठी आवारात प्रशासनाने शासकीय जागा दिली.

परंतु संबंधित कंपनीचे तसेच देणाऱ्या दानशूर व्यक्तींची मोठी जाहिरात या फिल्डरवर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी फिल्डर दिले, तर त्याचा गवगवा कशासाठी करायचा. संबंधित फिल्डर प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे का, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

वाढदिवसाला टप्पा

ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप नेहमीच जॉगिंगसाठी मैदानावर असतो. ग्रुप म्हटला की एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे आलेच. त्यावेळी कधी ज्याचा वाढदिवस असतो, तो पार्टीचा खर्च करतो; तर कधी पैसे गोळा करून. निमित्त एकच आनंद घेण्याचा. पण, ग्रुपमध्ये एखादा असतोच, जो आपलं वेगळेपण राखून असतो. याही ग्रुपमध्ये एक निवृत्त कर्मचारी.

दुसऱ्याचा वाढदिवस असेल तर गडी पहिल्या वाहनाने हजर. मात्र, याच महिन्यात त्यांचा वाढदिवस होता. सर्वांना त्यांचा वाढदिवस माहीतही होता. पण, गड्याने वाढदिवसाला टप्पा तर दिलाच, परत दोन दिवस मैदानालाच दांडी मारली. ग्रुपच्या सदस्यांनी फोन केल्यावर गडी तिसऱ्या दिवशी हजर झाला.

न येण्याचे कारण विचारता, लग्नाला गेल्याचे सांगितले. पण, पार्टीचे नाव काढताच ‘आता होऊन गेला, पाहू पुढच्या वर्षी’ असे तो म्हणाला. सदस्यांनी पार्टीसाठी अर्धे पैसे मागितले, त्यालाही गडी तयार नाही. आजही सदस्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे नावच टाकून दिले; पण गडी काही तयार झाला नाही.  (latest marathi news)

जागते रहो..!

सध्या शहरात क्राईम अधिक वाढल्याने शेजारी-पाजारी जागते रहोचा सल्ला एकमेकांना देतात. राजकारणातही सध्या ‘जागते रहो’चे दिवस आहेत. निवडणुका जवळ आल्याने पैशांचे वाटप होते. त्यामुळे ‘जागते रहो’ हा दोन्ही अर्थांनी वापरला जाणारा शब्द आहे; परंतु इच्छुक उमेदवारांसाठीही ‘जागते रहो’ म्हणण्याची वेळ आली आहे.

महाविकास आघाडीत उमेदवारी निश्‍चित झाली आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा शिंदे गट यांच्यात जागा निश्‍चित झाली नाही. जागा निश्‍चित झाली तरी उमेदवार कोण, याबाबत निश्‍चितता नाही; परंतु पक्षात उड्या मारण्याची अनेकांची तयारी आहे. मुख्यत्वे ज्यांना पक्ष बदल करायचा, ते रात्रीच्याच वेळी नेत्यांना मुंबईत भेटत असल्याने रात्री कधीही निरोप येऊ शकतो, या शंकेने ‘जागते रहो’ म्हणण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

SCROLL FOR NEXT