Badminton Racket esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता...! विसरभोळेपणाचा कळस अन्‌ बॅटचा भुर्दंड

Nashik News : अलीकडे कामाची दगदग अन्‌ धावपळीमुळे विसरभोळेपणा हा अनेकांचा स्‍वभावगुणच बनला आहे

सकाळ वृत्तसेवा

अलीकडे कामाची दगदग अन्‌ धावपळीमुळे विसरभोळेपणा हा अनेकांचा स्‍वभावगुणच बनला आहे. पण विसराळू स्‍वभावामुळे भुर्दंडदेखील सोसावा लागू शकतो, याची प्रचिती काही मित्रांना आली. मैदानावर बॅडमिंटन खेळून झाल्‍यावर आइस्क्रीमचा आस्‍वाद घेण्यासाठी मित्रांचा समूह दुकानावर पोचला.

मग काय, गप्पा रंगात आल्‍या अन्‌ हास्‍याचे फवारे उडू लागले. सर्वजण हास्यात इतके दंग झाले की, बॅडमिंटनच्‍या बॅट सुरक्षा भिंतीवर ठेवलेल्‍या आहेत, हेच ते विसरुन गेले. गप्पा झोडून झाल्‍यावर आपापल्या मार्गाने सर्व निघाले.

काही अंतरावर पोचल्‍यानंतर आपण बॅट दुकानाजवळ विसरल्‍याचे आठवण आल्‍यानंतर एकाने गाडी पुन्‍हा वळवली. पण दुकानाजवळ पोचल्‍यावर बॅट काही सापडली नाही. अन्‌ हास्याच्या नादात बॅटचा भुर्दंड झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर घडलेला हा प्रसंग पुन्‍हा एकदा सर्वांना हसविण्याचे निमित्त ठरला. (nashik SAKAL Special chalta bolta news)

पोलिसांप्रमाणे बँकेत कॅशियरकडून चौकशी

नाशिक मधील प्रतीथयश बँकेमध्ये एक गृहस्थ पैसे काढण्यासाठी गेले. गृहस्थाचे संबंधित बँकेत पत्नीचे खाते होते. चेक बेरर असल्यामुळे पैसे काढण्यासाठी काही अडचण नव्हती. गृहस्थांनी चेक जसा काउंटरवर मॅडमकडे दिला. तसा मॅडमने चष्मावर करून त्यांच्याकडे बघितले आणि विचारले तुम्ही कोण? सज्जन नम्रपणे म्हणाले मी खातेदारांचा पती आहे.

मॅडमने संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्याला ऑर्डर केली सही चेक करा. सगळे व्हेरिफाय करा, बँकेच्या मॅडमचा आवाज ऐकून गृहस्थांना अस जाणवलं की बँकेत नव्हे पोलिस स्टेशनलाच आलोय की काय ? ठाणे अंमलदारच माझी चौकशी करताय की काय? असं काही क्षणासाठी भाग झाला.  (latest marathi news)

शिक्षकांची अशीही धावपळ

दहावी, बारावीच्या परीक्षा आता संपले आहेत. त्यामुळे विद्यार्थी तणावमुक्त झाले आहेत, पण पेपरचे गठ्ठे डोक्यावर येऊन पडल्याने शिक्षक तणावात आहेत. तसेच परीक्षा पेपर घरी तपासण्यास बंदी असल्यामुळे शाळेतच हे गठ्ठे डोळ्याघालून घालावे लागतात. २५ पेपर तपासून झाले की, ते मॉडीएटरपर्यंत वेळेत पोचवण्यासाठी शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे.

एवढे करूनही विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये भलताच घोळ घातलेला दिसून येतो. एक प्रश्‍न पहिल्या पानावर तर त्यातील दुसरा उपप्रश्‍न भलत्याच पानावर सोडवलेला असल्याचे शिक्षक सांगत असून त्याला ‘कॅरी फॉरवर्ड’ करावे तर तिसऱ्या उपप्रश्‍नांचे उत्तर शेवटी लिहिलेले असते. हे सगळे बघून शिक्षकाला भोवळच यायची शिल्लक राहत आहे. हे सर्व गुण एकत्र करताना शिक्षकांची चांगली धावपळ मात्र होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT