political esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...! गाजरावर चाले राजकारण...

SAKAL Special : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी राजकीय पक्ष अन् नेत्यांनी कंबर कसल्याचे आता नागरिकांना दिसू लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

गाजरावर चाले राजकारण...

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी राजकीय पक्ष अन् नेत्यांनी कंबर कसल्याचे आता नागरिकांना दिसू लागले आहे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकात बसची वाट पाहात बसलेले काही तरुण प्रवासी यावर आपल मत व्यक्त करत होते.

बराच काळ त्यांची चर्चा ऐकलेले एक काका म्हणाले, निवडणुका जवळ आल्यात. आता पडेल आश्वासनांचा पाऊस आणि त्या पावसात भिजून तुम्ही आजचे तरुण मतदान करतात. त्यामुळेच देशातील राजकारण हे गाजरावर चालायला लागलंय. काकांच्या या उत्तराने तरुणही काही काळ विचारात पडले अन् आपली वाट धरली.

(nashik SAKAL Special chalta bolta Politics on carrot marathi news)

अशी ही बनवाबनवी

‘अशी ही बनवाबनवी’ या मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांनी केलेला अभिनय आजही लोकांना हसवतो. पण एखाद्या शिक्षकावर अशी वेळ आली तर त्याची कशी त्रेधातिरपीट उडते, याचा अनुभव एका शिक्षकाला आला.

दहा ते बारा वर्षे काम करूनही पगार मिळत नाही म्हणून एका शिक्षकाने शाळेची नोकरी सोडली आणि ते दुसरीकडे ‘जॉइन’ झाले. ही गोष्ट त्या संस्थेला त्यांनी कळविली नाही. एक दिवस अचानकपणे परीक्षेनिमित्त त्यांच्या संस्थेतील शिक्षक त्या ठिकाणी मुलांना घेऊन आले.

जुन्या संस्थेतील शिक्षकांना शाळेत बघितल्यानंतर नोकरी सोडलेल्या शिक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली आणि आता काय करावे म्हणून थोडा विचार केला. नंतर आपल्याला त्यांनी ओळखूच नये, यासाठी चष्मा आणि मास्क परिधान केला.

त्यांची ही शक्कल काम करून गेली. त्या शिक्षकांना जुन्या संस्थेतील शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी देखील ओळखू शकले नाही. आपली बनवाबनवी यशस्वी झाल्याचा आनंद सरांच्या चेहऱ्यावर आजही झळकत आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT