With the trainees in the introductory class organized by Janjati Kalyan Ashram On present recognition. esakal
नाशिक

Nashik News : युवकांनो, सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडू नका : संजय कुलकर्णी

Nashik : समाजविघातक शक्ती संपूर्ण जोर सोशल मीडियावर लावत असून समाज माध्यमांमधून ते विखारी प्रचार करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : समाजविघातक शक्ती संपूर्ण जोर सोशल मीडियावर लावत असून समाज माध्यमांमधून ते विखारी प्रचार करीत आहेत. समाज, संस्कृती व आपले भारतीयत्व टिकवण्याचे काम जनजाती युवकांनाच अधिक जोमाने करतांना, समाज तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहावे लागेल, असे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय सह हितरक्षा प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्‍यास संकुल येथे दोन दिवसीय युवा कार्य प्रशिक्षण वर्गाच्‍या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ( Sanjay Kulkarni statement of Youth do not fall in social media propaganda )

या शिबिरात पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध भागातील सत्तरहून अधिक जनजाती युवक-युवतींनी सहभाग नोंदविला होता. श्री.कुलकर्णी म्‍हणाले, की जनजाती समाजाच्या रुढी, परंपरा व संस्कृती जपण्याचे महत्त्वाचे कार्य जनजाती युवकांना करायचे आहे. ग्रामविकास, धर्मांतर व गावातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी युवकांनी प्रत्यक्ष झोकून द्यावे. जनजाती कल्याण आश्रम युवा कार्य परिचय वर्ग जनजाती कल्याण आश्रमाद्वारे आयोजित केला होता. (latest marathi news)

यात नाशिक, पुणे व नगर जिल्ह्यातील ७३ युवकांनी सहभाग घेतला. या वर्गामध्ये सहभागींना करियर मार्गदर्शन, महाविद्यालयीन जीवनातील समस्या, अडथळ्यांना सामोरे जात यश कसे मिळवावे यावर मार्गदर्शन केले. सकाळी उठल्यापासून योग प्राणायाम ध्यान तसेच चिंतन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. दुर्गम भागातील गावातील तरुणांना पुढे घेऊन येण्यासाठी, आवश्यक समस्यांवर मात करण्यासाठी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.

जीवनामध्ये सोशल मीडियाचा अतिरेक न करता योग्य तो वापर कसा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. चैतराम पवार यांनी मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी उपस्‍थिती नोंदविली. तसेच कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय युवा कार्यप्रमुख वैभव सुरंगे, पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके, प्रा. संजय साळवे, अशोक भुसारे, कुंतक गायधनी यांनी मार्गदर्शन केले. वर्गाच्या यशस्वीतेसाठी वैशाली हरसुलकर, लक्ष्मण टोपले, नाना देवरे, सोनाली हस्मे, पांडुरंग गायकवाड आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT