majhi shala sundar shala initiative  esakal
नाशिक

Sundar Shala : संतोष श्रमिक, अंदरसूलची शाळा देखणी! ‘सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुकास्तरीय 3 लाखाचे बक्षीस, जिल्हास्तरावर निवड

Latest Nashik News : माध्यमिक गटात बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद अंदरसूल मुलींची शाळा सुंदर शाळा ठरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : शाळांच्या विकासाला संधी देऊन रोख स्वरूपात बक्षीस देत कौतुक करणारा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात येवला तालुकास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. माध्यमिक गटात बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद अंदरसूल मुलींची शाळा सुंदर शाळा ठरली आहे. प्रथम क्रमांक मिळवत या शाळांनी तीन लाखांची बक्षीस जिंकले आहे. यातील दोन्ही गटातील प्रथम शाळा आता जिल्हास्तरावर पोहोचल्या आहेत. (3 lakh prize at taluka level sundar shala competition)

या अभियानात तालुकास्तरावर निवडलेल्या शाळा जिल्हा, विभाग व राज्यावर जाऊन स्वतंत्रपणे बक्षीसाने सन्मानित होणार आहेत. तालुक्यातील सहभागी शाळांनी ऑनलाइन मूल्यांकन करून गुण प्राप्त केले होते. त्याआधारे समित्यांचे अध्यक्ष, केंद्रप्रमुख व ज्येष्ठ शिक्षकांच्या पथकाने शाळांची पाहणी करत प्राप्त गुण व उपलब्ध सुविधांच्या आधारे मूल्यांकन करून तालुक्यातील दोन्ही गटात प्रथम तीन शाळांची निवड केली आहे. अभियानात शाळांना पायाभूत सुविधेसाठी ३३ गुण, शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण तर शैक्षणिक संपादणुकीसाठी ४३ गुण होते.

● असा आहे निकाल...

जिल्हा परिषद गट -

- प्रथम ः जि. प. मुलींची शाळा ः ३ लाख

- द्वितीय ः जि. प. शाळा अंगुलगाव ः २ लाख

जि. प. शाळा म्हसोबावाडी, कुसमाडी ः १ लाख

(latest marathi news)

माध्यमिक गट -

- प्रथम ः संतोष श्रमिक विद्यालय, बाभूळगाव ः ३ लाख.

- द्वितीय ः स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव ः २ लाख

- तृतीय ः मातोश्री शांताबाई सोनवणे, अंदरसूल ः १ लाख

"मूल्यमापन करून प्राप्त गुण व उपलब्ध सुविधांची पडताळणी करत हे क्रमांक ठरविले आहे.या माध्यमातून अनेक शाळांनी खूप सुंदर व चांगले काम उभे केले आहे."

- संजय कुसाळकर,गटशिक्षणाधिकारी,येवला

"भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता जपत शाळांनी विकास साधला आहेच, मात्र या अभियानाच्या माध्यमातून शाळांच्या विकासाला गती मिळाली आहे. अभियानातील निकषांची पूर्तता करण्यासाठी शाळांत सर्व सुविधाही उपलब्ध होतात."

- गोरख येवले, प्राचार्य, संतोष विद्यालय, बाभूळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT