state bank of india  esakal
नाशिक

Nashik Bank Scam : युनियननंतर आता स्टेट बँकेत घोटाळा? भरणा न केल्याने विमाधारकांत खळबळ

Nashik News : मनमाड येथील युनियन बँक शाखेतील घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील कथित फसवणुकीने एका ग्राहकाची झोप उडवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : येथील युनियन बँक शाखेतील घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील कथित फसवणुकीने एका ग्राहकाची झोप उडवली आहे. पेन्शन योजनेत भरण्यासाठी दिलेले पैसे विमा प्रतिनिधीने भरलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे युनियन बँकेप्रमाणे स्टेट बँकेतही मोठा घोटाळा तर नाही ना, अशी चर्चा विमाधारकांमध्ये सुरू आहे. (Scam in State Bank Excitement among policyholders due to non payment)

दोन महिन्यांपूर्वी येथील युनियन बँकेत फसवणूक झाल्याचा विमा घोटाळा उघडकीस आला असताना आता येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत एका विमाधारक महिलेची फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांकडे आला आहे. या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

संबंधित बँकेत एका विमा प्रतिनिधीने फसवणूक केली आहे. परंतु, अद्याप पोलिसांत फसवणुकीचा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. बँक व्यवस्थापकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की ३ जानेवारी २०२२ ला विमा प्रतिनिधींकडून संबंधित बँकेत पेन्शन प्लॅन योजनेत पैसे गुंतवणूक केले होते. (latest marathi news)

त्यानुसार २०२२ ते २०२४ असे तीन वर्षांचे हप्ते भरले होते. पैसे भरण्यासाठी विमा प्रतिनिधीकडे दिले होते. पहिला हप्ता अकाउंटवरून कपात करण्यात आला. तर दुसरा हप्ता रोख दिला होता. तर तिसरा हप्ता फोन पेद्वारे भरला होता. एकूण सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

"स्टेट बँकेत विमा प्रतिनिधीने विमाधारकाचे पैसे बुडवल्याची घटना खरी असून, याबाबत विमाधारकांनी माझ्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. याची चौकशी आणि कारवाईसंदर्भात वरिष्ठांकडे अर्ज पाठवला असून, तपास सुरू आहे." - विजयकुमार दीपक, शाखा प्रबंधक, स्टेट बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : कारे दुरावा कारे अबोला! मंत्री आबिटकर-मुश्रीफ यांच्यातील नाराजी उघड, बँकेच्या अहवालात पालकमंत्र्यांचा फोटोच नाही

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Stock Market Opening: सेन्सेक्स 27 अंकांच्या वाढीसह उघडला; बँकिंग शेअर्समध्ये विक्री, कोणते शेअर्स वाढले?

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Alert : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT