Students esakal
नाशिक

Nashik School First Day : जुन्या कपड्यांत होणार विद्यार्थ्यांचे स्वागत! मोफत गणवेश वाटप योजनेचा सावळा गोंधळ

Nashik News : शासनाने याबाबत फेरविचार करून शाळा व्यवस्थापन समित्यांना सर्वाधिकार द्यावेत, अशी मागणी पालक, शिक्षणप्रेमींनी केली आहे.

प्रशांत बैरागी

नामपूर : विद्येचे मंदीर असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे प्रवेशद्वार शनिवारी (ता.१५) उघडणार असल्याने शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू असली तरी जिल्ह्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचे स्वागत ‘जुन्या कपड्यातच’ होणार आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी शिक्षण विभागाचे अधिकारी, कापड ठेकेदार यांचा राज्यभर गाजलेल्या कथित कापड घोटाळ्याचा अनुभव गाठीशी असतानाही समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत गणवेश वाटप योजनेत झालेला बदल न उलगडणारे कोडं आहे. शासनाने याबाबत फेरविचार करून शाळा व्यवस्थापन समित्यांना सर्वाधिकार द्यावेत, अशी मागणी पालक, शिक्षणप्रेमींनी केली आहे. (Nashik Confusion of Free Uniform Distribution Scheme at nampur)

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरीत होणार आहेत. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षाअंतर्गत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पहिली ते ८ आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना प्रत्येकी दोन गणवेश संचाचा लाभ देण्यात येतो.

शासन निर्णयानुसार २०२३-२४ पासून समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात न येणाऱ्या दारिद्रय रेषेवरील पालकांच्या मुलांना राज्य शासनाच्या योजनेमधून दोन शालेय गणवेश संचाचा लाभ देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. (latest marathi news)

अद्याप कापडच आले नाही

राज्य शासनाने यावर्षीपासून ‘एक राज्य-एक गणवेश’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्या या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. सद्यस्थितीत शाळा १५ जूनपासून सुरू होत असूनही गणवेशाचे अद्याप कापडच आले नसल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशविना जाणार आहे. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन, गणवेश दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, यंदा फाटक्या कपड्यात ‘पुस्तक दिन’ साजरा करण्याची वेळ शाळांवर येऊन ठेपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT