room for heat stroke patients in a rural hospital and present Dr. Neha Singhal esakal
नाशिक

Nashik News : ग्रामीण रुग्णालयात उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष; वाढत्या उन्हाळ्यामुळे आरोग्य विभागाचा निर्णय

Nashik News : दिंडोरी तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहे. मे महिना तीव्र उन्हाच्या झळांचा राहणार आहे.

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेेवा

वणी : दिंडोरी तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहे. मे महिना तीव्र उन्हाच्या झळांचा राहणार आहे. पण त्याआधीच उष्माघाताचे रुग्ण उपचाराला येउ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून येथील ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. (Nashik Separate room for heat stroke in rural hospital)

दिंडोरी तालुक्यासह वणी परिसरात तापमानात सतत वाढ होत आहे. मार्चपासूनच तालुक्यात उन्हाचे चटके बसायला सुरवात झाली. एप्रिलही उकाड्याचा राहिला. मेमध्ये उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार वणी ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करीत उष्माघातांच्या रुग्णांसाठी ३ बेड आरक्षीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. एन. मोरे यांनी दिली.

रुग्णावर उपचार

वाढत्या उष्णतेचा परिणाम ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, मधुमेह रूग्ण, हृदय रोग रुग्णांवर होऊ शकतो. वणी ग्रामीण रुग्णालयात ही लक्षणे आढळलेल्या सुमारे ८ ते १० रुग्णांवर औषधोपचार करून बरे झाल्यावर घरी पाठविण्यात आले. (latest marathi news)

"ज्या रुग्णांना चक्कर येणे, शरीरातील तापमान वाढणे, लघवी कमी होणे, उलटी होणे, भोवळ येणे, जुलाब होणे, जीव गुदमरणे, डोके दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्यांनी वणी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा." - डॉ. नेहा सिंघल, वैद्यकीय अधिकारी वणी ग्रा.रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

Bhimashankar Temple: भाविकांसाठी मोठी बातमी! श्रावणात भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत खुले राहणार; ऑनलाइन बुकिंग

IND vs SL Test : श्रीलंकेने कसोटी संघ का जाहीर केलेला नाही? दोन खेळाडूंनी वाढवली डोकेदुखी; ४ दिवसावर पहिली कसोटी अन्...

Marathi News Live Updates : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

SCROLL FOR NEXT