Server Down  esakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ बँक खाते खोलण्यासाठी सर्व्हर डाउन! अर्ज भरताना सतत अडथळा

Nashik News : सिन्नर तालुक्यात बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्याचे आदेश दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यात बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्याचे आदेश दिले; परंतु अर्ज भरताना सतत अडथळा येत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची दमछाक होत असून, बँकेत खाते खोलण्यासाठी, तसेच आदी कामांसाठी नागरिकांना तासनतास ताटकळत थांबवावे लागत आहे. (Ladki Bahin Yojana)

अनेक तास थांबूनही काम लवकर होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन असल्याने बँकांसह विमानसेवा विस्कळित झालेला होत्या. कधी नेटवर्क नाही, तर कधी अर्ज सबमिट होत नाही, अशा अनेक तक्रारी असल्याने एक अर्ज भरण्यासाठी अख्खा दिवस जातो, तरीही अर्ज सबमिट होत नाही.

सध्या शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत घराघरांत केवळ ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचीच चर्चा रंगत आहे. कागदपत्रांची पूर्तता करताना अनेकांना मोठी तारांबळ उडत आहे. गावागावांतील जावई सासरवाडीला फोन करून तुमच्या मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला त्वरित पाठवा, म्हणून साकडे घालत आहेत. (latest marathi news)

तसेच सासरेबुवाही मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी मुख्याध्यापकांकडे फेऱ्या मारत आहेत. अनेकजण मुख्याध्यापकांकडे प्रवेश दाखल्यांची मागणी करत असल्याने मुख्याध्यापकांना रोज नावे शोधण्याचे काम लागले आहे. तातडीने दाखला द्या, म्हणून विनंती करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला दाखला वेळेत देण्यासाठी शाळा प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

बँका, आधारकार्ड, सायबर कॅफे येथे महिलांची गर्दी

बँका, सायबर कॅफे, तहसील या ठिकाणी महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, त्यात सर्व्हर डाउन असल्याने महिलांना दिवसभर थांबावे लागत आहे. त्यात दाखल्यासाठी अनेक महिलांना दूरवरून माहेरी यावे लागत असल्याने प्रवासाचा खर्चही वाढत आहे. प्रवासात वेळ जात असल्याने अनेकांना मनस्ताप करावा लागत आहे. प्रत्येक शासकीय ठिकाणी गर्दी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT