Men and women playing conch shell by Keshav conch shell team at an event in Malegaon. esakal
नाशिक

Shankhnad Pathak : महिला पथकाकडून नवरात्रोत्सवात शंखजागर! पुण्यानंतर मालेगावला 'शंखनाद' पथकाची स्थापना

Latest Nashik News : शंख वाजवण्याची कला ही आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे देशातील पहिले शंखनाद पथक पुण्यात असून त्यानंतर पहिली शाखा मालेगावात स्थापन झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : नव्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात कालबाह्य होत चाललेल्या संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी अनेक जण नव्याने वेगवेगळ्या गोष्टी करून नव्या पिढीसाठी ही साधने उपलब्ध करून देत आहे. शंख व शिंपले ही समुद्र किनाऱ्यासह मोठ्या नदीत आढळतात. शंख वाजवण्याची कला ही आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे देशातील पहिले शंखनाद पथक पुण्यात असून त्यानंतर पहिली शाखा मालेगावात स्थापन झाली आहे. (Shankhjagar in Navratri festival 2024 from women team)

गणेश जंगम यांनी या पथकाची स्थापना केली. या शंखनाद पथकात महिलांची संख्या लक्षणीय आहे.अगदी प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आपल्या पूजा-साधनेत शंख ध्वनीचा प्रयोग करतात. कुठल्या साधकाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांचं जीवन सुखमय बनवते.

शंखाचा ध्वनि पोहोचतो तिथपर्यंतच्या वातावरण चैतन्यदायी होते. शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो. योग प्रकारच्या माध्यमातून फुफ्फुस क्षमता प्रभावी होण्यासाठी शंख वाजवण्याची कला व सवय शरिरासाठी अतिशय चांगली आहे.

मालेगाव येथील शंखनाद पथकाचे माध्यमातून शहरातील विविध भागात शंखनाद करून वातावरण प्रसन्न करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. केशव शंखनाद पथक शहरातील शेकडो महिला, पुरुष व लहान मुलांना शंख कसा करायचा हे शिकविले जाते. या पथकात सर्वाधिक महिला आहेत. वयोगटाचे बंधन नाही. (latest marathi news)

शंखनादाचे फायदे

- स्नायू मजबूत होतात

- फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी.

- थायरॉईड ग्रंथीत सुधार होतो.

- बोलण्यात स्पष्टता येते

- सुरकुत्या दूर होतात.

मोफत प्रशिक्षण

महादेव मंदिर गणेश कुंड

क्रीडा संकुल ६० फुटी रोड

उपळेकर राम मंदिर कॅम्प

महादेव मंदिर पथक प्रमुख- कल्पना दुसाने

क्रीडा संकुल पथक प्रमुख- संगीता परदेशी

राम मंदिर प्रमुख -अनुराधा कोतुळकर

" भारतीय संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी शंखनाद उपक्रम व पथकाची स्थापना केली आहे. आरोग्यविषयक फायदा मोठ्या प्रमाणावर होतो."

- रमेश बागूल शहरप्रमुख,शंखनाद पथक मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st ODI Live: रोहित, विराटच्या पुनरागमनाचा फुसका बार... ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांसमोर भारताची हार! मालिकेत आघाडी

Thane News: मनसेने दिला ठाकरे गटाला मान! विद्युत रोषणाई कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Mokhada ST Bus : ऐण सणात भंगारात निघालेल्या बस प्रवाशांच्या सेवेला, जव्हार आगाराचा गलथान कारभार, प्रवासी त्रस्त

Nashik Police : चोरट्यांसाठी आयती संधी? 'माझा शेजारी, खरा पहारेकरी' उपक्रमावर पोलिसांचा भर

Akola Congress : काँग्रेसला हवाय ‘अंमलबजावणीचा नेता’ केवळ ‘गप्पांचा जिल्हाध्यक्ष’ नव्हे; बोचऱ्या टिकेनंतर प्रदेशाध्यक्षांच्याही भुवया उंचावल्या

SCROLL FOR NEXT