jangda.jpg 
नाशिक

साईनाथा! कोरोनाचे संकट दूर कर; नाशिक ते शिर्डी धावण्याचा अनोखा नवस

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा (ता.२६) डिसेंबर २०२० रोजी नाशिक ते शिर्डी धावणार असून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घालणार असल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.

गेल्या पाच वर्षापासून देताएत सामाजिक संदेश

गेल्या पाच वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सहावे वर्ष असून ते दरवर्षी विविध समाजिक उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करतात. या अगोदर बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे. यंदाच्या वर्षी ते कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घालणार आहे.

सुभाष जांगडा यांचा परिचय 
सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.

सह गावागावात त्यांचे स्वागत

२६ डिसेंबर २०२० रोजी आज सकाळी पहाटे ५ वाजता दत्त मंदिर सातपूर नाशिक येथून त्यांनी धावायला सुरुवात करणार आहे. त्यांनंतर सिन्नर, पांगरी सह गावागावात त्यांचे स्वागत होणार आहे.यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा,सल्लागार सुनील बुरड, जे पी जाधव, ॲड.वैभव शेटे, विशाल पाठक, संजू राठी, राजेश इसरवाल  आदी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT