Senior poet Ashok Naigaonkar and senior journalist Shrikant Bojewar chatting in a program organized by Public Library Nashik  esakal
नाशिक

Nashik News : राजकारण्यांपेक्षा साहित्यिक अधिक असहिष्णू : श्रीकांत बोजेवार

Nashik : मुळात मी सिनेमावाला माणूस. सदर लिहायचे ठरले तेव्हा टीका टीप्पणी करताना जबाबदारीने तारतम्य बाळगून लिहायचे होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुळात मी सिनेमावाला माणूस. सदर लिहायचे ठरले तेव्हा टीका टीप्पणी करताना जबाबदारीने तारतम्य बाळगून लिहायचे होते. २५ वर्षांत सदर लिहिल्यावर कुणी रागावले नाही पण, कऱ्हाड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांवर लिहिताना दोन भेंड्यांमधील संवाद लिहिल्यावर ते भडकले होते. नंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर राग निवळला पण राजकारण्यांपेक्षा साहित्यिक अधिक असहिष्णू असल्याचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी सांगितला. (nashik Shrikant Bojewar statement of Writers are more intolerant than politicians marathi news)

सार्वजनिक वाचनालयाकडून आयोजित ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्याशी ‘नायगावकरी तंबी दुराई’ गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मंगळवारी (ता.१९) झालेल्या कार्यक्रमात बोजेवार यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. ११ हजार रुपये, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

त्यानंतर गप्पांच्या मैफलीत पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा सत्कार करत बॅकलॉग भरून काढल्याचा टोला लगावत नायगावकरांनी बोजेवार यांना वाचनाविषयी विचारले. आई, वडील आणि आजी या तिघांपासून वाचनाची सवय लागली. त्यावेळी लहान मुलांना चित्रपट पाहण्यासाठी तिकीट लागायचे नाही म्हणून आजी मला कडेवर घेऊन चित्रपट बघायला जायची.

तेव्हापासून चित्रपट बघण्याची सवय लागली तर आईला वाचनाची आवड होती. शिवाय विदर्भात आईपेक्षा मावशीचे प्रस्थ अधिक त्यामुळे मराठीपेक्षा हिंदीचे वाचन केले आणि मुंबईत आल्यावर मराठी अधिक वाचायला मिळाले. मुंबईच्या धावपळीत लिखाणात निवांतपणा मिळतो का, तर पत्रकारितेत कमीत-कमी वेळात चांगले लिहावे लागते.  (latest marathi news)

मग शेजारी कितीही गोंगाट असला तरी काहीही ऐकायला येत नाही, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार निवड समितीतील ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, दिव्य मराठीचे संपादक अभिजित कुलकर्णी, लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांचा वाचनालयाकडून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अभय सदावर्ते यांचा सत्कार झाला. व्यासपीठावर सावाना अध्यक्ष प्रा दिलीप फडके, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, ॲड. अभिजित बगदे, देवदत्त जोशी, संजय करंजकर उपस्थित होते. प्रेरणा बेळे यांनी सूत्रसंचालन तर जयेश बर्वे यांनी आभार मानले.

वाचनालयाची इंदिरानगरला शाखा

मराठी नवीन वर्षात म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंदिरानगर येथे सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन शाखेचा प्रारंभ होत आहे. लायब्ररी ऑन व्हील या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता इंदिरानगर येथील रहिवासी अविनाश बल्लाळ यांनी वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT