In Saraf Bazar, Patvekari means artisans weaving gold and silver ornaments. esakal
नाशिक

Nashik Gold Silver Rates: पितृपक्षात चांदीचा भाव 10 हजारांनी वाढला!! सोने प्रतितोळा 5 हजारांनी तर, हिऱ्यांच्या मागणीत अत्यल्प वाढ

Latest Nashik News : सोन्या, चांदीचे दागिने या तुलनेत स्वस्त: असतात आणि सुरक्षित गुंतवणूक, लग्न सोहळ्यांसाठी पहिल्या पसंतीचे दागिने खरेदीचा ट्रेन्ड आतापासून सुरु झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Gold Silver Rates : पितृपक्षातही सोन्या, चांदीची झळाळी कायम असून, सोन्यापेक्षा चांदीच्या दरात दहा हजारांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये चांदी ९५ हजार रुपये प्रतिकिलो तर सोने ७८ हजार रुपये प्रतितोळा इतक्या दराने विक्री होत आहे. (gold Silver price increased in Pitrupaksha)

सर्वसामान्य ग्राहकांपासून ते श्रीमंत व्यक्तींपर्यंत बहुतांश लोक सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याकडे बघितले जाते. या तुलनेत हिऱ्यांमधील गुंतवणूक ही गर्भश्रीमंत व्यक्तींची गुंतवणूक असल्याने त्याच्या मागणीत अत्यल्प वाढ झालेली दिसून आली.

हिरे १० सेंट, १५ सेंट व कॅरेट या मापकात विक्री केले जातात. एका कॅरेटसाठी किमान साडेतीन लाख ते पाच लाखापर्यंतचा हिरा विक्री होतो. कुठल्याही हिऱ्याची किंमत ही कॅरेट, क्वॉलिटी, कलर व कट या चार ‘सी’ वरून निश्‍चित होते.

सोन्या, चांदीचे दागिने या तुलनेत स्वस्त: असतात आणि सुरक्षित गुंतवणूक, लग्न सोहळ्यांसाठी पहिल्या पसंतीचे दागिने खरेदीचा ट्रेन्ड आतापासून सुरु झाला आहे. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीनंतर लग्नसराईत सोन्या, चांदीच्या मागणीत अधिक वाढ होते. शहरात सुमारे ५०० सराफ व्यावसायिक आहेत. तर सोन्या-चांदीची घडणावळ करणारे कारागीर दीडशे आहेत. (latest marathi news)

"गेल्या दोन वर्षांत सोने, चांदीमधील गुंतवणुकीने सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक त्याकडे बघतात. यामुळे सोन्याचे चांदीचे दर कितीही वाढले तरी ग्राहक त्याची खरेदी करतील."- गिरीश नवसे, अध्यक्ष (सराफ असोसिएशन नाशिक)

"सोने खरेदीनंतर घरी घेऊन जाण्यापूर्वी आमच्याकडे (पटवेकरी) घडणावळीसाठी आणले जातात. ग्राहकांच्या विश्‍वासर्हतेला कुठेही तडा जाऊ न देता चार पिढ्यांपासून आम्ही हे काम करत आहोत. मंगळसूत्र, पुतळ्या, ठुशी, वज्रटीक, तनमणी, मोत्याचे हार गुंफण्याची पिढ्यानपिढ्यांची आमची परंपरा आजही आहे."- अनंता जंगम, सराफ बाजार (नाशिक)

दागिने घडणावळ (पटवेकरी)

- मंगळसूत्र-१०० ते ५०० रुपये (मनी व मजुरीसह)

- पुतळ्या-६० रुपये (प्रती)

- ठुशी-६०० रुपये

- वज्रटीक-१२०० रुपये

- तनमणी-१८० रुपये (पदरानुसार)

मोत्यांचे हार-प्रत्येक पदरावर हिशोब

बांगड्या-१२० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT