Speaking at the Simhastha Kumbh Mela review meeting, Rural Development Minister Girish Mahajan, Divisional Commissioner Radhakrishna Game, Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar, Collector Jalaj Sharma, Police Commissioner Sandeep Karnik etc. esakal
नाशिक

Simhastha Kumbh Mela : रामतीर्थ, त्र्यंबकेश्‍वरमधील अतिक्रमण हटविणार; गिरीश महाजन यांची अधिकाऱ्यांना सूचना

Simhastha Kumbh Mela : रामतीर्थावरील सिमेंट काँक्रिटीकरण व त्र्यंबकेश्‍वरमधील अतिक्रमण हटविण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री तथा कुंभमेळा समितीचे अध्यक्ष गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

Simhastha Kumbh Mela : नाशिकसह त्र्यंबकेश्‍वरमध्ये तीन वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रामतीर्थावरील सिमेंट काँक्रिटीकरण व त्र्यंबकेश्‍वरमधील अतिक्रमण हटविण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री तथा कुंभमेळा समितीचे अध्यक्ष गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिले. नियोजनाच्या पहिल्याच बैठकीत लोकप्रतिनिधींनी सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडल्याने प्रशासनासमोर कामे मार्गी लावण्याचे आव्हान असणार आहे. (nashik Simhastha Kumbh Mela ramtirtha and Trimbakeshwar to remove encroachments marathi news)

मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक गुरुवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, सरोज अहिरे व डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या कुंभमेळ्यात पहिल्या शाहीस्नानाला भाविकांची गैरसोय झाली, त्यामुळे यंदा नियोजन करताना भाविकांसाठी शहरात वाहनतळ, कमीत कमी बॅरिकेटिंग असावे, अशा सूचना मंत्री महाजन यांनी केल्या. पाच कोटी भाविक कुंभमेळ्यासाठी येण्याचा अंदाज असल्याने रामतीर्थ येथील वस्त्रांतर गृहाची इमारत, तसेच त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमणांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.

कुशावर्तावर होणारी गर्दी लक्षात घेता कुंडाचा आकार वाढविण्यासह अन्य उपाययोजनांबद्दलही योग्य तो विचारविनिमय करून निर्णय घ्यावा. त्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघाला सामावून घेताना त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशा सूचना मंत्री महाजन यांनी केल्या. २०२७-२८ मधील कुंभमेळ्यासाठी महापालिकेने ११ हजार ६०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. ( latest marathi news )

लोकप्रतिनिधींनी मांडल्या सूचना

लोकप्रतिनीधींनी कुंभमेळ्यातील कामे आणि आराखड्याविषयी काही सूचना केल्या. शहरातील रस्त्यांची व पुलांची कामे तत्काळ हाती घ्यावीत. मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतेत वाढ करताना गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रामतीर्थ व गोदापात्रातील काँक्रिटीकरण दूर करताना शहराभोवती रिंगरोड उभारावा, अशा सूचना आमदारांनी केल्या. त्र्यंबकेश्वर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा जटिल असून, त्याबाबतही योग्य निर्णय घेत ही समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.

नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर सहापदरी

नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग सहापदरी करण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. नव्याने दोन लेनमध्ये पालखी मार्गाचा विचार करून मार्गाची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

१७ हजार कोटींचा आराखडा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेशिवाय सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय व राज्य महामार्ग विभाग, पाटबंधारे व अन्य विभागांचा मिळून सुमारे सहा हजार कोटींचा आराखडा असून, एकूण १७ हजार कोटींच्या आसपास संपूर्ण आराखडा असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. महापालिकेचा आकृतिबंध शासनस्तरावर धूळखात पडून असून, ३० वर्षांत शहर अभियंत्यांची पदे भरली नसल्याची तक्रार आमदारांनी केली. लवकरच आकृतिबंध मंजुरीसह अभियंत्यांची पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

ठळक घडामोडी

- शहरात १६० किलोमीटरचे रिंगरोड प्रस्तावित

- नवीन २१ पूल उभारण्यात येणार

- साधुग्रामसाठी ५०० एकर जागेचा प्रस्ताव

- विल्होळी- सारूळ- त्र्यंबक रोड रिंगरोडचा प्रस्ताव

- सिंहस्थात शहरात मुख्य, मध्य व बाह्य वाहनतळ

- शहरातील घाट, दिशादर्शकांच्या पुनर्बांधणीची गरज

- गणेशवाडी अग्निशमन केंद्र प्रस्तावित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT