चंदनाचे लाकूड sakal
नाशिक

सिन्नर : चंदनाचे लाकूड बाळगणाऱ्या परप्रांतीय तरुणीस अटक

वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर दोडी गावाजवळ चंदनाच्या झाडाची लाकडे तोडून गोणीत घेऊन जाणाऱ्या २९ वर्षीय तरुणीस वावी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. मूळची मध्य प्रदेशातील असलेल्या या तरुणीने चंदनाच्या लाकडांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तिला सिन्नर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बुधवारी (ता. २०) दुपारी दोडी शिवारात चंदन तस्करी करणारी महिला फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांना मिळाली. त्यावरून पोलिस पथक शोध घेत असताना दोडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला उद्दी आर्शिव्हा राजकुमार (वय २९, रा. कटनी, मध्यप्रदेश, ह.मु. नाशिक रोेड रेल्वेस्थानक) संशयास्पद उभी होती. पोलिसांनी हटकल्यावर ती उलटसुलट माहिती देऊ लागली. त्यामुळे तिच्याजवळ असणाऱ्या प्लॅस्टिक गोणीची पोलिसांनी तपासणी केल्यावर चंदनाची सुगंधित लाकडे आढळून आली.

लाकडे चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी तरुणीस नांदूर शिंगोटे येथील चौकीत आणले. मात्र, पोलिसांना तिने माहिती सांगण्यास नकार दिला. आपण हे लाकूड संगमनेरला विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे तिचे म्हणणे होते. त्यानुसार पोलिस तिला घेऊन संगमनेरला गेले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नोंद करून तिला चंदन विक्री ठिकाणी घेऊन चल, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, कुठे जायचे ते आठवणीत नसल्याचे ती म्हणाली. आपल्या इतर सहकाऱ्यांची नावे सांगण्यास तिने नकार दिला. आपण नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात रूद्राक्ष व जडीबुटी विक्री करीत असल्याची माहिती तिने दिली.

पोलिसांनी तिच्या जवळून ३० किलो वजनाचे चंदनाचे लाकूड जप्त केले. या लाकडात गाभा विकसित झाला असून, बाजार मूल्यानुसार त्याची किंमत प्रतिकिलो १५ हजार रुपयांपर्यंत आहे. हवालदार दशरथ मोरे यांच्या फिर्यादीवरून उद्दी आर्शिव्हा हिचाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, तिच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही. न्यायालयात तिचे साथीदार हजर होतील, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, पोलिसांना गुंगारा देत एक महिला साथीदार न्यायालय परिसरात घेऊन गेली. या महिलेने न्यायालयात वकीलपत्र घ्यावे, म्हणून एका वकिलास विनंती केली. मात्र, वकिलासही त्या महिलेबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस ठाण्यात चंदनाचा दरवळ

परप्रांतीय तरुणीकडून जप्त केलेले चंदनाचे लाकूड ठेवलेल्या पोलिस ठाण्यातील खोलीत चंदनाचा सुगंध दरवळत असल्याचे जाणवते. जप्त केलेले लाकूड पक्व झाडाचे असून, त्यात बऱ्यापैकी गाभा विकसित झाला आहे. अर्धा ते एक किलो वजनाचे तुकडे करून ते प्लॅस्टिकच्या गोणीत वाहून नेले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ४२ वर्षांनंतर ताजमहल केस नंबर १३३८१ संपली! १९८४ दाखल झालेल्या या याचिकेत नेमकं काय होतं? खरं कारण माहिती आहे का?

Junnar News : कठोर मेहनत, शारीरिक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीनने मिळविले यश

Human Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात सायको; भयानक सूडबुद्धी, यांच्याशी दुश्मनी करण्याआधी दहा वेळा विचार करा

Pune Khed Kadadhe News: कडधे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात १३९५ दाखल्यांचे वाटप, नागरिकांना विविध योजनांचा लाभ

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

SCROLL FOR NEXT