MLA Manikrao Kokate discussing with the authorities the revised proposal to get water under the Sinnar River Linking Project. esakal
नाशिक

Nashik News : नदीजोडचा 13 हजार कोटींचा सुधारीत प्रस्ताव; खासदारानंतर आता सिन्नरच्या आमदारांकडूनही पाठपुरावा

Nashik News : दुष्काळी भागाला नदीजोड प्रकल्पांतर्गत पाणी मिळवून देण्यासाठी सुधारीत १३ हजार २५० कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रीक समितीला सादर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला नदीजोड प्रकल्पांतर्गत पाणी मिळवून देण्यासाठी सुधारीत १३ हजार २५० कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रीक समितीला सादर करण्यात आला आहे. आचारसंहितेनंतर त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्याला नाशिकच्या पश्‍चिम वाहिनी नद्यांतून नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. (river linking project)

समितीची शिफारस होऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर साधारण दोन महिन्यांच्या आत १३ हजार २५० कोटी रुपयांच्या या नदीजोड प्रस्तावास मंजुरी मिळण्याची आशा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण दृष्काळी सिन्नर तालुक्याचे भाग्य उजळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. नदीजोड प्रकल्पासाठी प्रथमपासून जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांच्या मदतीने पाठपुरावा करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी सप्टेंबर महिन्यातच प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रकल्प सर्वसमावेशक असावा, अशी मागणी करीत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यात काही सुधारणा सुचवत पुन्हा एकदा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रीक समितीकडे सादर केला आहे.

नाशिकच्या पश्‍चिम पट्ट्यातील समुद्रात वाहून जाणारे पाणी दमणगंगा व वैतरणा खोऱ्यातील पाणी वैतरणा धरणात सोडण्यात येणार आहे. तेथून ते कडवा धरणाद्वारे दारणा व बोरखिंड धरणात सोडण्यात येणार आहे. (latest marathi news)

बोरखिंड धरणातून देवनदीत आणि देवनदीतून पूरकालवे व अन्य मार्गातून तालुक्यातील विविध भागात सोडले जाणार आहे. तालुक्याच्या शेतीला व घरगुती वापरासाठी हे पाणी सोडले जाणार असून, त्यातून शिल्लक पाणी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी मिळणार आहे.

सर्वात उंच भागातून होणार वितरण

सिन्नरच्या दुष्काळी पट्ट्यातील गोंदे व सुळेवाडी या दोन गावचा परिसर सर्वाधिक उंचावर आहे. सोनांबेमार्गे सरदवाडीच्या पुढे देशवंडी येथील ढग्या डोंगराच्या आत बोगदा करून हे पाणी सुळेवाडी येथे जाईल. तेथून पूर्व भागातील वितरण व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील देशवंडी.

नायगाव, जायगाव, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री, निमगाव सिन्नर, हिवरगाव, कोमलवाडी, वडांगळी व गुळवंचमार्गे खोपडी, देवपूरमार्गे पाण्याची वितरण व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. गोंदेहून शेवटच्या वारेगाव-सायाळे या भागापर्यंत हे पाणी जाणार आहे. देशवंडी येथून सोडण्यात येणारे पाणी कडवा कालव्यात सोडण्यात येणार आहे. उन्हाळ्यातही कडवाला आवर्तन येईल. कडवाचे ३ ते ४ आवर्तने होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT