Doctors esakal
नाशिक

Nashik NMC News : मानधनावर डॉक्टर नियुक्तीला मान्यता

Nashik NMC : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४२ डॉक्टर मानधनावर भरण्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४२ डॉक्टर मानधनावर भरण्याच्या वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. मंजुरी देताना वैद्यकशास्त्र, स्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ व त्वचारोग तज्ज्ञांच्या मानधनात ३५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महापालिकेच्या तीन शहरात पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य केंद्र चालविले जातात. (Nashik Standing Committee approved proposal of Medical Department to pay doctors on emoluments in municipal hospitals)

नव्याने १०५ दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून आरोग्य सेवेवर मोठा ताण येत आहे. तर दुसरीकडे महापालिकेत अन्य पदासह डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागात विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची सध्या १८९ पदे मंजूर आहेत.

त्यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४२ पदे सहा महिन्यांसाठी मानधनावर भरण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शासनाकडून महापालिकेच्या भरतीला परवानगी दिली होती. त्याअंतर्गत जवळपास ८४ डॉक्टर भरले जाणार होते. (latest marathi news)

परंतु, ही प्रक्रियादेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी नव्याने ४२ पदे मानधनावर भरली जाणार आहे. या मानधनावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ७५ हजारापर्यंत मासिक वेतन होते.

त्यात आता ३५ हजार रुपयांनी वाढ करत १ लाख दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. वैद्यकशास्त्र, स्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ व त्वचारोग तज्ज्ञांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. ३ कोटी ७५ लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

धक्कादायक! पोस्टमनने दोन वर्षांपासून पत्रं वाटलीच नाही, घरात ढीग; आधारकार्डपासून कोर्टाच्या नोटीसीपर्यंत कागदपत्रे सापडली

Horoscope : उद्या 27 एप्रिलला बनतोय धनतारिणी योग! 'या' 3 राशीच्या लोकांवरचे मोठे संकट टळणार; नव्या महिन्यात घरी येईल बक्कळ पैसा

बापरे... अभिषेक शर्मा चालत असताना पोरीनं अचानक हातच ओढला अन् पुढे काय घडलं पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update: नवरीच्या वडिलांची भन्नाट कल्पना! पाहुण्यांसाठी स्प्रिंकलरने थंडावा

SCROLL FOR NEXT