PM Poshan Shakti nirman
PM Poshan Shakti nirman esakal
नाशिक

PM Poshan Shakti Diet: ‘सोयामिल्क’ने होणार विद्यार्थ्यांचे पोषण! आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रधानमंत्री पोषण शक्ती आहारात सुधारणा

प्रशांत बैरागी

नामपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार आहे. यंदापासून पूरक आहारासोबतच विद्यार्थ्यांना अंडी आणि केळी दिली जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासह सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना सोयामिल्क देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. (nashik PM Poshan Shakti diet marathi news)

देशातील शाळांमधून राबविली जाणारी, सर्वांत जादा लाभार्थी असणारी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना होय. शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने, तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने १९९५-९६ पासून ही योजना लागू केली आहे. सुरवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे चालविण्यात येत असलेल्या योजना प्राथमिक शाळा, तसेच अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला. या योजनेचे महत्त्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा समावेश राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा दहा फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये केलेला आहे.

...असा असतो पोषक आहार

पोषक आहार योजना केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून देशात ओळखली जाते. विद्यार्थ्यांना आहारातून पोषक तत्त्वे मिळावीत, त्याचबरोबर त्यांनी ते पदार्थ आवडीने खावीत हा विचार करून पाककृती निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी दररोज वैविध्यपूर्ण आहार निश्‍चित करून त्यात डाळ-भात आणि खिचडीबरोबरच हिरवा वाटाणा, व्हेज पुलाव, सोया चंक्स, मसालेभात, वांगीभात, नाचणी सत्व, भगर, शेवगा आदींचा समावेश केला जाईल. (latest marathi news)

अंड्याचाही झाला समावेश

गेल्या काही महिन्यांपासून जे विद्यार्थी अंडी खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडी, अन्य विद्यार्थ्यांना केळी वाटप केली जात आहे. आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात येईल. शाळांमध्ये परसबाग आवश्यक करण्यात आली असून, यातील भाज्या आणि सलाडचा देखील आहारात समावेश करावा, असे नियोजन सुरू आहे.

केंद्र शासनाच्या निकषात बसणाऱ्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत (पूर्वीचे नाव शालेय पोषण आहार योजना) सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समितीही स्थापन केली आहे.

"राज्यातील सोयाबीन हे मुख्य पीक असून, शेतकऱ्याला आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्वसमावेशक वापर करण्याच्या अनुषंगाने शिक्षण व कृषी विभागाने पुढाकार घेऊन प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र आदी ठिकाणी सोयामिल्कची योजना तातडीने राबवावी."

- प्रवीण अहिरे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT