Power company officials Rajendra Bhambar, Pradip Wattamwar, Mangesh songire and staff present during the Wadala operation. esakal
नाशिक

Nashik Electricity Theft : लाखोंची वीजचोरी पकडण्यात यश! वडाळा गाव परिसरात वीज कंपनीची धडक कारवाई

Nashik News : इंदिरानगर येथील वीजप्रश्न आणि वडाळा येथील कथित भंगार गुदामांमध्ये वीजचोरी होत असल्याच्या आरोपांनी घेरल्या गेलेल्या वीज कंपनीने ॲक्शन मोडमध्ये येत तपासणी मोहीम राबवली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अनेक दिवसांपासून इंदिरानगर येथील वीजप्रश्न आणि वडाळा येथील कथित भंगार गुदामांमध्ये वीजचोरी होत असल्याच्या आरोपांनी घेरल्या गेलेल्या वीज कंपनीने मंगळवारी (ता. ९) ॲक्शन मोडमध्ये येत सात तास वडाळा परिसरातील सुमारे २०० घरे, भंगार बाजारातील दुकाने आणि गुदामांची धडक तपासणी मोहीम राबवली. (Nashik Electricity Theft)

साधारण २४ ते २६ ठिकाणी लाखोंची वीजचोरी पकडण्यात वीज कंपनीला यश आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अनधिकृत वायर आणि वीज चोरीसाठी वापरले जाणारे इतर साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या सर्व कारवाईचा गोषवारा तयार करण्यात येत होता.

सकाळी १० वाजता अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारका विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर, द्वारकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. एम. सोनवणे, सहाय्यक अभियंता मंगेश सोनगिरे, मनोज कातकाडे, विशाल निंबाळकर, सतीश मेहर, हेमंत भिरूड, ऋतुजा दहिभाते, प्रदीप वट्टमवार, नितीन पाटील, नितीन पगारे.

योगेश्वर पाटील, महाजन या अधिकाऱ्यांसह ३२ जणांच्या मिळून सहा टीम करण्यात आल्या आणि एकाच वेळी सर्व बाजूंनी तपासणीची कारवाई सुरू केली. अचानक सुरू झालेल्या मोहिमेमुळे एकच खळबळ माजली. इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. (latest marathi news)

तपासणी करत असताना अधिकाऱ्यांनी मुख्यतः बसवण्यात आलेले मीटर, रीडिंग, मागील वीजबिल, अतिरिक्त केबल आदी बाबींची तपासणी केली. संशयित ठिकाणी कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत एकूण कारवाईचा गोषवारा तयार करण्यात येत होता.

दरम्यान, धडक कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर भागात महावितरण कंपनीच्या नियमानुसार तपासणी मोहीम राबवली गेली आहे. त्याचा गोषवारा आणि संपूर्ण अहवाल तयार करणे सुरू आहे. तो आल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT