Sonali Gangurde accepting appointment letter at a program held here. esakal
नाशिक

Success Story : जिद्दीच्या जोरावर सोनाली बनली अभियांत्रिकी सहाय्यक! सरळसेवा भरतीतून निवड

Success Story : ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन् चिकाटी असेल तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

Success Story : ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन् चिकाटी असेल तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सोनाली उत्तम गांगुर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अभियांत्रिकी सहायक उत्तीर्ण होत आपल्या परिवाराचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सरकारी नोकर भरतीचे प्रमाण कमी होत असताना ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत आहेत. (nashik Success Story Sonali became an engineering assistant marathi news)

महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीतून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर सोनाली यांची निवड झाली. मुळचे निफाड तालुक्यातील कोकणगावचे रहिवाणी असलेले उत्तम गांगुर्डे व्यवसायानिमित्त लाखलगाव (रामाचे) येथे स्थायिक झाले. हॉटेल व्यवसाय सांभाळत त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केले.

सोनाली यांनी अभियांत्रिकीसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या मविप्र समाज संस्थेच्या के.बी.टी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एमई कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’चे शिक्षण ती घेत आहे. सोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्‍या अभियांत्रिकी सेवा परीक्षा तसेच राज्यसेवा परीक्षांची देखील तयारी करीत आहेत.  (latest marathi news)

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लाखलगाव येथील माधवराव बोरस्ते हायस्कूलमध्ये घेत असताना एसएससीपर्यंत कधीही वर्गात प्रथम क्रमांक सोडला नाही. यापूर्वी २०१८ मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे तिचे ध्येय आहे.

आजोबांकडून प्रेरणा

सोनाली यांचे वडील हॉटेल व्यावसायिक आहेत. तर आई त्यांना व्यवसायात मदत करते. सोनाली यांचे आजोबा भास्कर गांगुर्डे नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमधून निवृत्त झाले आहेत. सोनाली यांनी आपल्या आजोबांचा आदर्श घेत शासकीय सेवेत दाखल होण्याचे ठरवले होते.

''लहानपणापासूनच प्रशासकीय अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे. ग्रामीण भागातून यश मिळवणारे विद्यार्थी वाढत आहेत. ही समाधानाची बाब आहे. माझा यशात माझी शाळा माझे गुरुजन तसेच सर्व कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे.''- सोनाली गांगुर्डे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT