Various officials felicitating Janardhan Bairagi. esakal
नाशिक

Success Story : माधवगिरी मागणाऱ्या कुटुंबातील तरुण PSI! राजापूर येथील जनार्धन बैरागीचे देदीप्यमान यश

Nashik News : ध्येय, प्रबळ इच्छाशक्ती अन्‌ प्रचंड मेहनती घेतली तर भाग्य उजाळल्याशिवाय राहत नाही हे सिद्ध केले आहे राजापूर येथील जनार्धन बैरागी याने.

सकाळ वृत्तसेवा

येवला‌ : ध्येय, प्रबळ इच्छाशक्ती अन्‌ प्रचंड मेहनती घेतली तर भाग्य उजाळल्याशिवाय राहत नाही हे सिद्ध केले आहे राजापूर येथील जनार्धन बैरागी याने. वडीलांचे भाग्य नशिबात नाही आणि आई मोलमजुरी करते. आईच्या कुटुंबाला माधवगिरी (भिक्षा) मागण्याची परंपरा आहे. अशा सर्वसाधारण कुटुंबातील जनार्धन याने थेट दिल्लीत पीएसआयपदाला गवसणी घातली. याचवेळी वन विभागातही त्याला नियुक्ती मिळाली आहे. (Nashik Success Story PSI Janardhan Bairagi from Rajapur marathi news)

राजापूर येथील गरीब कुटुंबातील जनार्दन बैरागी याने मिळविलेले यश नव्या पिढीला प्रेरणादायी नव्हे, तर आदर्शवतच आहे. राजापूर येथे त्याचा सत्कार झाला. जनार्दनची आई बालूताई यांनी टेलरिंग काम करून दोन मुलांचे शिक्षण केले. बालूताई बैरागी, आजोबा भीमाबाबा बैरागी, मामा गणेश बैरागी यांनी मुलांसाठी विशेष मेहनत घेतली.

मुलाने आईच्या कष्टाचे चीज साध्य करून दाखविले. आजोबाचे वडील (वै.) हिरामणबाबा बैरागी यांच्या आशीर्वादाने भिमाबाबा बैरागी आजही रोज गावात भिक्षा मागतात. या भिक्षेचे फळ जनार्दन बैरागी यांना मिळाले आहे. जनार्दनची डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. (Latest Marathi News)

जनार्दनचा मामा गणेश रंगकाम करीत असल्याने तोही त्यांना मदत करायचा. दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणी, कांदालागवड असे रोजंदारीची काम करून आपले शिक्षण राजापूर व नंतर येवला येथे केले. त्याने कष्टाने मिळविलेले यश भूषणावह असल्याने जनार्दन व त्यांच्या आई बालूताई बैरागी सत्कार झाला. लक्ष्मण घुगे, उपसरपंच ज्ञानेश्वर दराडे, पोपट आव्हाड, प्रमोद बोडके, विजय वाघ, माऊली महाराज, योगेश अलगट आदींनी जनार्दन बैरागी यांनी त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

माजी सरपंच सुभाष वाघ, पोपट आव्हाड, संजय वाघ, संजय भाबड, तुळशीराम विंचू, जगदीश वाघ, दत्तू दराडे, अशोक आव्हाड, शिवाजी बोडके, शंकर अलगट, समाधान चव्हाण, अनिल अलगट, रामकृष्ण बांगर, संजय कासार, सोमनाथ बांगर, जगदीश वाघ, दिलीप अलगट, अनिल घुगे, सुभाष वाघ, समाधान पालवे, शंकर मगर, वाल्मीक घुगे, सचिन बैरागी, सौरभ बैरागी व बैरागी परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

Solapur Crime:'साेलापुरात नवविवाहितेचा दहा लाख रुपयांसाठी छळ'; सात जणांवर गुन्हा दाखल, जाचहाट व छळ अन्..

छावणीच्या थकीत बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’; ‘इन्साफ कब मिलेगा’ म्हणत सत्ताधारीच अधिवेशनात आक्रमक !

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT