Summer Heat Waves esakal
नाशिक

Nashik Summer Heat : दशकात नाशिक यंदा सर्वाधिक उष्ण; एप्रिलमध्येच सरासरी ओलांडली

Summer Heat : एप्रिलच्या मध्यावरच नाशिकचा पारा चाळिशीपार गेल्याने नाशिककर सध्या कडक उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat : एप्रिलच्या मध्यावरच नाशिकचा पारा चाळिशीपार गेल्याने नाशिककर सध्या कडक उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. गेल्या दहा वर्षांतील सरासरी तापमानाचा पारा एप्रिलमध्येच ओलांडल्याने राज्यातील सर्वाधिक उष्ण १५ जिल्ह्यांच्या यादीत नाशिकचा समावेश होण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त होत आहे. मागील दहा वर्षांच्या सरासरी तापमानाची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठेवली जाते. (Nashik summer heat crosses 40 degrees in middle of April marathi news)

त्यानुसार महाराष्ट्राचे सरासरी तापमान ४१.७३ अंश सेल्सिअस आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांच्या यादीत २० जिल्ह्यांचा पारा चाळीसच्या आत असल्याने त्यांना थंड जिल्हे संबोधले जाते. यात नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांत नाशिक जिल्ह्याचे सरासरी तापमान ३९.५४ अंश सेल्सिअस राहिले. १५ जिल्ह्यांचा पारा चाळीसच्यावर जात असल्याने त्यांना ‘हॉट’ जिल्हे म्हटले जाते. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा पारा सरासरी ४० ते ४५ च्या वरच राहिलेला आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आपत्ती व्यवस्थापन विभगामार्फत मार्गदर्शन केले जाते. नाशिकमध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती उद्‌भवत नाही. म्हणून जिल्हा परिषद, महापालिकांच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणाकडे फार गांभीर्याने पाहिले नाही. यंदा झालेल्या प्रशिक्षणास महापालिकेच्या दोनच अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

आता एप्रिलमध्येच नाशिकचा पारा ४० अंश सेल्सिअसच्यावर गेल्याने मेमधील उकाडा अनुभवायला मिळत आहे. उष्माघातामुळे लोक आजारी पडू नये किंवा बळी जाऊ नये, यासाठी आरोग्य विभाग आता सतर्क झालेला दिसतो. नागरिकांनी दुपारी बारा ते तीन या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, नाशिकचा पारा इतक्या झपाट्याने वाढल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. दुपारी असह्य उकाडा जाणवत असल्याने सायंकाळी पावसाचे वातावरण तयार होते. (latest marathi news)

पाऊसही पडत नसल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतो. नाशिककरांना या वातावरणाची अनुभूती मेमध्ये येते. परंतु, यंदा एप्रिलमध्येच अशी परिस्थिती जाणवत असल्याने नाशिक आता थंड राहिलेले नाही, असेही लोक बोलू लागले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार नाशिकने गेल्या दहा वर्षांची सरासरी ओलांडल्याने राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत त्‍याचा समावेश होण्याची शक्यता बळावली आहे.

जिल्ह्यातील १४ तालुके ‘हॉट’

राज्यातील उष्णतेच्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश होत असताना जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा पारा चाळीसच्या वर पोहोचला आहे. तब्बल ५२ महसूल मंडळांमधील गावांमध्ये असह्य उकाडा जाणवत असल्याने या ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

''नाशिक जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्येच चाळीसच्या पार गेल्याने नागरिकांनी आतापासून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आवश्‍यकता नसेल तर दुपारी घराबाहेर पडू नये. उन्हाचा त्रास जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. छत्री, रूमाल, हेल्मेट, स्कार्फचा वापर अवश्‍य करावा.''- कृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (नाशिक)

दहा वर्षांतील तापमानाची सरासरी

जिल्हा..........सरासरी तापमान (अंश सेल्सिअस)

नाशिक......३९.५४

धुळे.....४१.८९

जळगाव.....४३.२३

अकोला.....४४.१२

भंडारा.......४४.२६

अमरावती.....४४.२८

बुलढाणा........४४.३५

वर्धा.............४४.९३

वाशीम.........४४.६३

यवतमाळ.....४५.५३

चंद्रपूर.........४५.३१

गोंदिया.......४५.०१

लातूर........४३.४१

नागपूर......४४.१२

नांदेड........४१.२६

नंदुरबार........४२.३५

अशी घ्या काळजी

- पुरेसे पाणी प्या, दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे

- डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा

- दुपारी बारा ते तीनदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे

- उष्णतेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्राद्वारे माहिती घ्यावी

- हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत

- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक प्यावे

- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत

- चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

- जनावरांना छावणीत ठेवावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे

- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा

- पंखे, ओले कपडे याचा वापर करावा

- सतत काम करण्यापेक्षा मधे-मध्ये विश्रांती घ्‍यावी

- गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्‍यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT