Sparrow
Sparrow esakal
नाशिक

Nashik Summer Heat : अहो, आमच्यासाठी दाणा पाणी ठेवा हो..! चिमणी पाखरांची आर्त हाक ओळखा

प्रमोद पाटील

चिचोंडी : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच असून उन्हाच्या तीव्रतेमध्ये पशुपक्षांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरी पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवावे. यामुळे पशू-पक्ष्यांना लाभ होईल, असे आवाहन पशू-पक्षी प्रेमींनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा पक्षी-प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.

चिचोंडी परिसरामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. म्हणूनच घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे. (Nashik Summer Heat put some water for birds marathi news)

एप्रिल महिन्याच्या तीन दिवसांत ४० अंशाच्या आसपास तापमान गेले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वांनाच तीव्र उष्णतेच्या झळा लागत आहेत. वातावरणातील नियमितच्या बदलामुळे तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न करतो.

असेच काहीसे प्राणी-पक्ष्यांचेही आहे. त्यांनाही पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी अनेक प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू होतो. निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी-पक्ष्यांनाही महत्त्व आहे. सद्यस्थितीत सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून आपण प्राणी-पक्ष्यांसाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तळमळीने प्रयत्न केले पाहिजे.

अनेक पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था आज पुढे येऊन काम करत असून आपणही घराच्या खिडकीत, अंगणात, इमारतीच्या गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे. जेथे दाट वृक्ष आहेत, १०-१५ फुटापर्यंत वाढलेली झुडुपवर्गीय झाडे या उन्हाळ्यात छाटू नका किंवा ते तोडू नका. त्या झुडपांमध्ये या पक्षांना वास्तव्य करता येणार असल्याचे जाणकार सांगतात. (latest marathi news)

अशी करता येईल व्यवस्था

•घरी सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्ष्यांना अंघोळही करता येईल, असे भांडे असावे.

•पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्था करता येईल. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शीत व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवता येतील.

•पाणी आणि धान्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे आदींचा वापर करून फीडर तयार करता येईल. असे कृत्रिम फीडर आता बाजारातही उपलब्ध आहेत.

•मातीचे पात्र बांधणे शक्य नसेल तर प्लास्टिक बरण्यांचा वापर केला जाऊ शकतो. झाडाखाली, झुडपात सावली राहील तिथे पाणी व धान्य ठेवावे.

•उद्यानात जाता-येताना आवर्जून सोबत पाणी घेऊन जा आणि झाडांना टांगलेल्या पात्रात ओता. घरून बाहेर निघताना सोबत पाणी ठेवा जेणेकरून शक्य होईल, त्या पात्रात पाणी भरता येईल.

"उन्हाळा वाढल्याने पक्ष्यांना डिहायड्रेशनाचा त्रास होतो. लोकांनी, पक्षीप्रेमी नागरिकांनी वेळ काढून घराच्या गॅलरीत, गच्चीवर किंवा इमारतीच्या भिंतीवर मीठ, साखर घातलेले पाणी एका भांड्यामध्ये ठेवले पाहिजे. हे पाणी पक्षांना थंडावा देते. मूर्च्छित होण्यापासून वाचवते."

- डॉ. प्रदीप दाणे,पक्षीप्रेमी नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT