Summer Heat esakal
नाशिक

Nashik Summer Heat : हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद; नाशिकचा पारा पोचला 41.2 अंश सेल्सिअसवर

Summer Heat : सूर्य पुन्‍हा आग ओकू लागला असून, रविवारी (ता.२८) नाशिकच्‍या कमाल व किमान तापमानाने नवा उच्चांक गाठला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat : सूर्य पुन्‍हा आग ओकू लागला असून, रविवारी (ता.२८) नाशिकच्‍या कमाल व किमान तापमानाने नवा उच्चांक गाठला. कमाल तापमान ४१.२ अंश सेल्‍सीयस तर किमान तापमान २४.९ अंश सेल्‍सीयस नोंदविले आहे. पाऱ्यात वाढ झाल्‍याने उकाडादेखील वाढला आहे. गेल्‍या आठवड्यात सलग तीन-चार दिवस नाशिकचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्‍सीयसपेक्षा अधिक नोंदविले गेले होते. (temperature touched 41 degrees Celsius )

नंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्‍यानंतर पारा काही प्रमाणात घटला होता. रविवारी दिवसा काही वेळ शहरात वातावरण ढगाळ राहिले. मात्र प्रखर सुर्यकिरणांचा सामना नाशिककरांना करावा लागला. पार वाढू लागला असताना यंदाच्‍या हंगामातील नवा उच्चांक गाठला गेला. रविवारी नाशिकचे कमाल तापमान ४१.२ अंश सेल्‍सीयस राहिले. (Latest Marathi News)

कमाल तापमानाप्रमाणे किमान तापमानातही वाढ झालेली आहे. यापूर्वी या हंगामातील किमान तापमान २४.५ अंश सेल्‍सीयसपर्यंत पोचले होते. मात्र हा स्‍तरही ओलांडताना २४.९ अंश सेल्‍सीयस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्‍यान उकाड्यात कमालीची वाढ झालेली असून, दिवसा घर, कार्यालयाला बाहेर पडताना आवश्‍यक खबरदारी घेतली जात आहे. तर रात्रीच्‍या वेळी उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी कुलर, एसीचा आधार घेतला जातो आहे. येत्‍या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज असल्‍याने नाशिककरांची लाही लाही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT