Survey campaign for out of school children from tomorrow esakal
नाशिक

Nashik News : शाळाबाह्य बालकांसाठी उद्यापासून सर्वेक्षण मोहीम! जि. प. प्राथमिक शिक्षणकडून मोहीम

Nashik News : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ जुलै ते २० जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम राबविली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ जुलै ते २० जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम राबविली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात ही मोहीम राबविण्याबाबत नियोजन केले असून, सर्व गटशिक्षणाधिकारी. (Survey campaign for out of school children from tomorrow)

महापलिका प्रशासनाधिकारी यांना पत्र देत अंमलबजावणीबाबतचे निर्देश दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांत रोजगारानिमित्त कुटुंब स्थलांतरित होतात. वाढत्या स्थलांतरामुळे बालके शाळाबाह्य होत आहेत. तसेच बालमजुरी व बालविवाहाचे प्रमाणही मोठे आहे.

यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे शाळाबाह्य स्थलांतरित व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोधमोहीम राबवावा, असा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमात महसूल, ग्रामविकास.

नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने राबविली जाणार आहे. त्यासाठी महापलिका, तालुका, गटशिक्षणाधिकारी, केंद्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात यावी. मोहिमेचा अहवाल २५ जुलैपर्यंत सादर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. (latest marathi news)

येथे होणार सर्वेक्षण

शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांच्या नोंदी घरोघरी, प्रत्येक गावात, शहरात, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजार, गुऱ्हाळ, घर, गावाबाहेरील पाल, वीटभट्ट्या, दगडखाण, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नल, रेल्वे, फुले व अन्य वस्तू विकणारी, तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती.

तेंदूपत्ता वेचणारी, विड्या वळणारी आदी ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालके, मागास वंचित गटातील व अल्पसंख्याक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती या शोधमोहिमेत घ्यावी. महिला बालविकासांतर्गत बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था येथील मुला-मुलींचाही या शोधमोहिमेत समावेश करावा.

शोधमोहिमेची कार्यपद्धती

- ३ ते ६ वयोगटाचे सर्वेक्षण जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि महिला व बालविकास, बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण नागरी)

- ६ ते १४ ची कार्यवाही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व १४ ते १८ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

- मोहिमेची अंमलबजावणी तालुकास्तरावरील अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या मदतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस ३ ते १८ वयोगटातील बालकांची शोधमोहीम पूर्ण करतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT