Police officers and personnel showing the items with the suspected accused in the Indian Bank robbery. esakal
नाशिक

Nashik Crime News : इंडियन बँक फोडीतील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून जेरबंद; घरफोडीच्या एकूण 7 गुन्ह्यांची उकल

Nashik Crime : विविध ठिकाणी चोरी व घरफोडी केलेल्या एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मुंबई-आग्रा महामार्गावरील इंडियन बँकेत चोरी करून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने विविध ठिकाणी चोरी व घरफोडी केलेल्या एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून तब्बल एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकुमार शिवशंकर प्रसाद (वय २२, रा. मुळगाव लक्ष्मीपूर, बिहार सध्या अंबड) असे जबरी चोरी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. (Suspects in Indian Bank robbery arrested by MIDC police)

गेल्या वर्षी १८ जुलै २०२३ रोजी याच संशयिताने अंबडच्या इंडियन बँकेतील स्ट्रॉंग रूमला भगदाड पाडून बँकेतील तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातून तब्बल वर्षभरापासून संशयित फरार होता. यानंतर १९ जुलै २०२४ रोजी याच चोरट्याने पुन्हा एकदा इंडियन बँक फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही व पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अमित कुमार याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याला खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने अंबड औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्येही चोरी केल्याचे कबूल केले. एकूण सात चोरीचे गुन्हे या चोरट्याकडून उघडकीस आले असून यातून तब्बल १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संशयित अमित कुमार प्रसाद हा चोरटा मूळ बिहार येथील आहे.

हा वर्षभरापूर्वी नाशिक शहरात कामानिमित्त आला होता. यावेळी इंडियन बँकेत खाते खोलण्यासाठी गेल्यानंतर या ठिकाणी सर्व काही पाहून याच ठिकाणी चोरी करण्याचे त्याने ठरवले होते. नंतर तब्बल दोनदा बँकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षा

Friendship Day 2025: मित्राला कधीही 'हे' 5 गिफ्ट देऊ नका, मैत्रीच्या नात्यात येऊ शकतो दुरावा

Pune Municipal Corporation : कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कठोर कारवाई

ENG vs IND, 5th Test: भारताच्या मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नांवर पडणार पावसाचं पाणी? जाणून घ्या हवामान अंदाज

Bridge Construction: शेतकऱ्याचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यासमोर; अंजना नदीपुलावरील बांधकामाच्या वादातून घेतले होते विष

SCROLL FOR NEXT