Akash Dhanwate  esakal
नाशिक

Nashik Sweeper Murder Case : सोशल मीडियावर ॲक्टिव्ह मोरे पोलिसांना सापडेना; सफाई कामगार खून प्रकरण

Sweeper Murder Case : आकाश धनवटे याच्या निर्घृण खून प्रकरणात सराईत गुन्हेगार व भाजप माथाडी सेलचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याचे नाव आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंडित कॉलनीत सफाई कामगार आकाश धनवटे याच्या निर्घृण खून प्रकरणात सराईत गुन्हेगार व भाजप माथाडी सेलचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याचे नाव आले आहे. मात्र, घटना घडल्यापासून पसार झालेला संशयित मोरे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असून पोस्ट टाकतो आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली मात्र अद्याप तो हाती लागलेला नाही. यासंदर्भात मात्र शहराच्या राजकीय वर्तुळात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा आहे. (Sweeper Murder Case Police could not find More active on social media )

मंगळवारी (ता. १) सकाळी साडेसहाच्या सुमारास पंडित कॉलनीत सफाई कर्मचारी आकाश धनवटे याच्यावर तिघा संशयितांनी कोयता, चॉपरने वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी त्याचा भाऊ मकरंद उर्फ सोमा संतोष धनवटे (रा. घारपुरे घाट) याच्या फिर्यादीनुसार, व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख, अथर्व दाते, अक्षय तरे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल आहे. पोलिसांनी अवघ्या ९ तासात अल्पवयीन मुलासह तिघांना पेठमधून अटक केली होती.

संशयितांच्या चौकशीतून सराईत गुन्हेगार मोरे याने आकाशला मारण्यासाठी दबाव टाकला होता, अशी माहिती समोर येत आहे. मोरेच्या अटकेसाठी पोलिसांची पथके त्यांच्या मागावर पाठविली असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. परंतु दुसरीकडे मोरे याने सोशल मीडियावर नवरात्रोत्सव आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यासंदर्भात शुभेच्छाच्या पोस्ट टाकल्या आहेत. तर दुसरीकडे तो पोलिसांच्य हाती लागत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT