Talathi Bharti Result esakal
नाशिक

Nashik Talathi Bharti Result : तलाठी भरतीचा निकाल जाहीर; 173 जणांची निवड

Nashik Talathi Bharti Result : बहुचर्चित तलाठी भरतीत नाशिक जिल्ह्यात १७३ जणांची निवड यादी अन् सोबतच १७२ जणांची प्रतिक्षा यादीही जाहीर झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Talathi Bharti Result : बहुचर्चित तलाठी भरतीत नाशिक जिल्ह्यात १७३ जणांची निवड यादी अन् सोबतच १७२ जणांची प्रतिक्षा यादीही जाहीर झाली आहे. लवकरच त्यांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पेसा क्षेत्रातील १०१ जागांचा निकाल अद्यापही राखीव असून न्यायालयाच्या निकालानंतरच त्यावर निर्णय होणार आहे. (Nashik Talathi Recruitment Result Announced Selection of 173 people)

तलाठी भरतीची प्रक्रीया तब्बल वर्षभरापासून सुरुच आहे. परीक्षेतील गैरप्रकार, निकालातील गोंधळ या सर्वच बाबींमुळे शासनालाही या भरतीमुळे प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले. अशातच जानेवारीच्या मध्यात २३ जिल्ह्यांची तलाठी भरतीची निवड यादी जमाबंदी आयुक्तांकडून जाहीर झाली होती. यात परीक्षा २०० गुणांची अन् काहींना २१४ म्हणजे २०० पेक्षा अधिक गुण कसे मिळाले, यावरुन आक्षेप नोंदविण्यात आले होते.

त्यामुळे शासनाकडून पुन्हा सुधारित यादी नुकतीच ११ मार्चला जाहीर केली आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातील बिगर पेसा क्षेत्रातील उमेदवारांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२३ च्या स्थितीनुसार त्यावेळी रिक्त जागा आणि अनुशेष भरण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. (latest marathi news)

परंतु त्यानंतर म्हणजे ७ महिन्यांत बरेच तलाठी सेवानिवृत्त झाले आहेत. अनेकांना पदोन्नती मिळाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील रिक्त बिगर पेसा क्षेत्रातील प्रत्येक जागेची तपासणी करूनच उमेदवारांना नियुक्ती देणार आहेत. १०१ पेसाच्या जागांची प्रतिक्षा - पेसा क्षेत्र १०० टक्के, ७५ टक्के ५० व २५ टक्के असे प्रमाण आहे. त्यानुसार १०१ जागा राखीव आहेत. या जागांवर अर्ज भरतानाच उमेदवारांना पर्याय दिला होता. त्याचा निकाल अद्यापही राखीव ठेवला आहे.

१७३ पदांची प्रवर्गनिहाय निवड यादी

सामाजिक प्रवर्ग निवडलेले उमेदवार प्रतीक्षेतील उमेदवार

अनुसूचित जाती १७ २१

अनुसूचित जमाती ०५ ०९

विमुक्त जाती (अ) १० १५

भटक्या जमाती (ब) ०२ ०४

भटक्या जमाती (क) ०७ ११

भटक्या जमाती (ड) ०१ ०५

विशेष मागास प्रवर्ग ०५ ०८

इतर मागास प्रवर्ग ३२ ४०

आर्थिकदृष्ट्या दुर्बल १८ २१

अराखीव पदे (खुली) ७६ ३८

एकूण १७३ १७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT