Vivek Kolhe, an independent candidate from Nashik Teachers' Constituency and Neelima Pawar, former general secretary of the Maratha Vidya Prasarak Sanstha, while interacting with reporters. esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency Election : स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारास प्राधान्य : विवेक कोल्हे

Nashik News : शिक्षकांनीच ही निवडणूक हाती घेऊन स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचा निश्चय केला आहे. असा दावा नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिक्षकांना गुलाम बनविण्याची भाषा निंदनीय आहे. त्यांना फुले, आंबेडकरांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विसर पडलेला दिसतो. माझ्या प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. माझा स्वच्छ जीवनपट सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता शिक्षकांनीच ही निवडणूक हाती घेऊन स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचा निश्चय केला आहे. (Vivek Kolhe statement Preference for candidates with clean image)

असा दावा नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. कोल्हे व मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कोल्हे म्हणाले, की माझ्यावर एकही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नाही.

याउलट प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, हे वास्तव मतदारांना ठाऊक आहे. या मंडळींनी मतदार याद्यात बनावट मतदार घुसविले आहेत. या निवडणुकीत आमची पोलिंग बूथरचना मजबूत व जागरूक असेल. बनावट मतदार आम्ही निवडणूक यंत्रणेच्या लक्षात आणून देऊ. कुठल्याही परिस्थितीत बनावट मतदान होऊ देणार नाही. (latest marathi news)

शिक्षक व शिक्षक संघटनांच्या आग्रहावरून या निवडणुकीत उतरलो आहे. मी शिक्षकांसाठी काय करू इच्छितो, हे सांगण्यासाठी ‘विवेकनामा’ या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यातील प्रत्येक आश्वासन मी पूर्ण करेन, याचीही जाणीव शिक्षकांना आहे.

त्यामुळे ही लढत दुरंगी किंवा तिरंगी नव्हे, तर एकतर्फी होईल. शिक्षक स्वच्छ प्रतिमेच्या व प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला पाठबळ देतील, असे चित्र निर्माण झाले आहे. एका अर्थाने ही निवडणूक शिक्षकांनी हाती घेतली. पाचही जिल्ह्यांत मला त्याचा अनुभव येतो आहे.

"दिवंगत माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांनी मराठा विद्याप्रसारक संस्थेला वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५० एकर जमीन उपलब्ध करून दिली. त्याची कधीही वाच्यताही केली नाही. मात्र, आता विरोधक त्याबाबत विचारतात, यासाठी आपण आज (कै.) कोल्हे यांच्या या योगदानाची माहिती जाहीर करीत आहोत." - नीलिमा पवार, माजी सरचिटणीस, मराठा विद्याप्रसारक संस्था, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT