school esakal
नाशिक

Nashik News : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके; महापालिका शिक्षण विभागाचा उपक्रम

Nashik : महापालिका शाळांमधील १ लाख १४ हजार ८९५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका शाळांमधील १ लाख १४ हजार ८९५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली. सरकारी शाळांमध्ये गळतीचे प्रमाण कमी होऊन शंभर टक्के उपस्थिती राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक पुरविले जातात. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची योजना आहे. (nashik Textbooks to students on first day of school )

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडूनदेखील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित अशा एकूण ३०४ शाळांमध्ये पाठ्यपुस्तक दिले जाणार आहेत. १ लाख १४ हजार ८९५ पुस्तके संचांची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे यापूर्वी नोंदविण्यात आली होती. मराठी माध्यमाच्या २६६, उर्दू माध्यमाच्या २४, हिंदी माध्यमाच्या ८, इंग्रजी माध्यमाच्या ४ तर गुजराती माध्यमाच्या २ शाळांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

शिक्षण विभागाला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून पाठ्यपुस्तक प्राप्त झाली आहेत. त्यानुसार शाळानिहाय पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील.

''सर्व शिक्षा अभियानांतर्गत सरकारी तसे अनुदानित अशा ३०४ शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.''- बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका.

माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या

मराठी- १,०१७३४

हिंदी- २,८१८

उर्दू- ७,८८३

इंग्रजी- १,९९५

गुजराती- ४६५

इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके

पहिली - ११,९७७

दुसरी - १३,००५

तिसरी - १४६३५

चौथी - १५,३३९

पाचवी - १४,५६३

सहावी - १४,८२३

सातवी - १५,०९५

आठवी - १५,४५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT