Suspect detained by police. esakal
नाशिक

Nashik Crime News : रोड शोमध्ये सहभागी होणे पडले महागात; चोरट्यांकडून लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime : रोड शो दरम्यान चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे लाखांचा ऐवज लंपास केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : खासदार राहुल गांधी यांचा द्वारका ते शालिमार रोड शो चोरांसाठी चांगला दिवस ठरला. रोड शो दरम्यान चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे लाखांचा ऐवज लंपास केला. रोड शोमध्ये सहभागी होणे चांगलेच महागात पडले. दरम्यान पोलिसांनी एका संशयितास अटक केली. हरून अली शौकत आली (वय.२५, रा. आझादनगर मालेगाव) असे संशयिताचे नाव आहे. (nashik thieves took advantage of crowd and looted around lakhs worth of gold chains mobile phones marathi news)

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेस शहरात उदंड प्रतिसाद मिळाला. द्वारका भागातून यात्रेस सुरुवात झाल्याने यामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत संशयितांनी गर्दीत हात की सफाई केली. रोड शो दरम्यान तीन जणांच्या सोन्याच्या चैन, अंदाजे ९ ते १० मोबाईल आणि पाच ते सहा पाकीट त्यात हजारांची रोख रक्कम असा सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ( latest marathi news )

रोड शो पुढे गेल्याने द्वारका चौकात काहीशी गर्दी कमी झाली. त्यानंतर नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान मुंबई नाका पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे रोहिदास सोनार आणि समीर शेख यांनी द्वारका भागातूनच हरून आली शौकत आली नामक संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पाकीट जप्त केला.

त्यात केवळ दीडशे रुपये आढळून आले. तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांपैकी एकाचे ते पाकीट असल्याने त्याने पाकिटात ४ हजार रुपये असल्याचे सांगितले. पोलिसांकडून अन्य संशयितांचाही शोध घेत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

Pimpri Chinchwad Noise: कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची ३६८ दुचाकींवर धडक कारवाई

Latest Marathi News Live Update : मेहरूण तलाव वाचवण्यासाठी जळगावात आजपासून आमरण उपोषण

Agriculture News : ४३० एकरवरील फुलशेती कोमेजली! हक्काच्या बाजारपेठेसाठी शेतकरी आता मुख्यमंत्र्यांच्या दारी

Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

SCROLL FOR NEXT