Admission esakal
नाशिक

Diploma Admission : डिप्‍लोमा नोंदणीची आज अखेरची मुदत

Diploma Admission : दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Diploma Admission : दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोंदणी करता यावी, यासाठी नोंदणीला मुदतवाढ दिली होती. ही वाढीव मुदत गुरुवारी (ता. १७) संपत आहे. आता आणखी एकदा मुदतवाढ मिळते, की पुढील प्रक्रिया राबविली जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. (Today is last date for diploma registration )

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. कॅप राउंडमध्ये सहभागासाठी आधी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी गुरुवार (ता. १८)पर्यंत मुदत असेल. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार याच कालावधीत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. (latest marathi news)

ई-स्‍क्रुटीनी व प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी असे दोन पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्‍ध आहेत. शनिवारी (ता. २०) तात्‍पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल. रविवार (ता. २१) पासून २३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना तक्रार, हरकती नोंदविण्याची मुदत असेल. अंतिम गुणवत्तायादी २५ जुलैला प्रसिद्ध होईल. नोंदणीला मुदतवाढ दिल्‍यास या वेळापत्रकात बदल होण्याची शक्‍यता आहे.

कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर

सध्या ‘डीटीई’मार्फत तीन फेऱ्यांचे प्रवेशपत्रक जाहीर केले आहे. पहिल्‍या फेरीतील प्रवेश प्रक्रियेसाठी २६ ते २९ जुलैपर्यंत नोंदणीची मुदत असेल. या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी ३१ जुलैला प्रसिद्ध होऊन विद्यार्थ्यांना १ ते ६ ऑगस्‍ट या कालावधीत प्रवेशाची मुदत असेल. यानंतर पुढील फेरीची प्रक्रिया पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

SCROLL FOR NEXT