Tomato Rate Hike sakal
नाशिक

Nashik Tomato Rate Hike : किरकोळ बाजारात टोमॅटोने गाठली शंभरी! दुष्काळ, अवकाळीमुळे आवक घटल्याने दरवाढ

Tomato Rate Hike : आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडलेल्या टोमॅटोची आवक कसमादे पट्ट्यात कमालीची घटली आहे.

रवींद्र मोरे

Nashik Tomato Rate Hike : आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडलेल्या टोमॅटोची आवक कसमादे पट्ट्यात कमालीची घटली आहे. या काळात घाऊक बाजाराती दर ५० रुपये किलोवर गेले आहेत. तर किरकोळ बाजारात टोमॅटो ८० ते १०० रुपयाने खरेदी करावा लागत आहे. उन्हाळ्यात लागवड झालेले टोमॅटो पिक सध्या बाजारात येत आहे. हवामान बदलाची झळ टोमॅटोला बसली. उन्हाचा तडाखा असल्यामुळे फुलगळ झाली. (Tomato reached 100 in retail market)

उन्हाळ्यात अनेक दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे राहिले. तापलेले वातावरण आणि पाणीटंचाईचा फटका टोमॅटो उत्पादनाला बसला. या संकटातून वाचलेल्या टोमॅटो पिकाला नंतर अवकाळी पावसाची झळ बसली. या परिस्थितीमुळे ८० टक्के आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या आता पावसाने उघडीप दिल्याने पेरणीपुरता पाऊस काटवन व मोसम खोऱ्यात झालेला आहे. नदी, नाले कोरडेठाक पडल्याने विहिरींना पाणी नाही. (latest marathi news)

टोमॅटोला पाणी मिळेल कसे, या विवंचनेत आता शेतकरी सापडला आहे. प्रत्येक पिकामध्ये पैसे मिळतील, याची शाश्‍वती नाही. गेल्यावर्षी प्रचंड उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भरून निघाला नाही. काहीच दर मिळत नव्हता. अनेकदा टोमॅटो फेकून देण्याची वेळ येत होती. सध्या कमी आवकेमुळे टोमॅटोला भाव असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दोन पैसे मोजक्याच शेतकऱ्यांना मिळत आहे.

''एप्रिल व मे महिन्यात तापलेले वातावरण व पाणी कमी पडल्याने अनेकांची रोपे खराब झाली. जी रोपे लागली त्यांना पावसाचा फटका बसला व अति तापमान सुरुवातीला असल्याने फुलगळ झाली. आज पाणी आहे असे मुळीच नाही. पावसाचा जोर कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. बऱ्यापैकी भाव असला तरी खर्च पाहता नफा कमीच मिळतो.''- सुधाकर पवार, टोमॅटो उत्पादक, मानूर (ता. कळवण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT