Traffic jam at Dwarka Chowk. esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : सुटता सुटेना द्वारका चौकातील वाहतूक कोंडी

Nashik Traffic Problem : द्वारका चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग शोधणे वाहनचालकांसह नागरिकांना जिकरीचे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Problem : द्वारका चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग शोधणे वाहनचालकांसह नागरिकांना जिकरीचे झाले आहे. यामुळे पोलिस प्रशासन आणि महापालिकेकडून योग्य ते नियोजन करत वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Nashik traffic problem at Dwarka Chowk marathi news)

शहराचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाणारा द्वारका परिसर वाहनांनी नेहमी गजबजलेला असतो. प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने पायी ये जा करणारे आणि परिसरातील व्यवसाय, रुग्णालय, बँक, हॉटेल येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना मार्गक्रमण करताना अडचणी येतात. बेशिस्त वाहन चालक आणि महापालिका, पोलिस प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

अनधिकृत खासगी बस आणि वाहनांचा थांबा वाहतूक कोंडीत भर टाकत आहे. शिवाय येथील भुयारी मार्गही बंद असल्याने पादचारी द्वारका चौकातूनच मार्गस्थ होतात. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होऊन अपघाताच्या घटना घडतात. त्याचप्रमाणे सर्कलचा आकार अवाढव्य असल्याने ‘असून अडचण नसून खोळंबा असा प्रत्यय येत आहे.

महापालिकेने येथील चारही बाजूचे अतिक्रमण हटवावे, द्वारका सर्कलचा आकार कमी करावा, तर पोलिस विभागाने द्वारका चौकातील भुयारी मार्ग पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांसह दुचाकी चालकांसाठी मोकळा करून दिल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

वाहतूक कोंडीचे कारणे

-पोलिसांच्या नियोजनाचा अभाव

-द्वारका चौकातील अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

-खासगी वाहनधारक आणि ट्रॅव्हल्सनी सर्विस रोडचा घेतलेला ताबा

-द्वारका सर्कलचा अवाढव्य आकार

-रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी चालकांचे थांबे

-बेशिस्त वाहन चालक

-रस्त्यांना पडलेले खड्डे ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

Davadi News : रेटवडी येथील तरुण ओढ्यात दुचाकीसह वाहून बेपत्ता

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचा निधी संपला! विद्यापीठ शासनाला पाठविणार सुधारित अंदाजपत्रक; पुतळ्याचे तोंड उत्तरेकडे नको, पूर्वकडे करण्याची नवी मागणी

SCROLL FOR NEXT