All the branches of three trees were cut off by the power company employees when there was no power line in Mauli Lawns area. In another photo, the trees in the park were slaughtered from the ground up. esakal
नाशिक

Nashik MSEDCL Tree Cutting : झाडांची छाटणी की कत्तल? वीजवितरण कंपनीवर कारवाईची मागणी

Nashik News : यासंदर्भात ना पर्यावरण प्रेमींकडून आवाज उठविण्यात आला, ना महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी मात्र व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik MSEDCL Tree Cutting : पावसाळ्यापूर्वीची कामे करताना वीज महावितरण कंपनीकडून सध्या शहरातील वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांची छाटणी सुरू आहे. परंतु काही ठिकाणी वीज तारा नसताना झाडांच्या छाटणीच्या नावाखाली अक्षरश: अर्धेअधिक झाडच तोडले आहे. एवढेच नव्हे तर एका उद्यानातील दोन झाडांची तर बुंध्यापासून तोडले आहे.

त्यामुळे झाडांच्या छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तलच करण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात ना पर्यावरण प्रेमींकडून आवाज उठविण्यात आला, ना महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी मात्र व्यक्त केली आहे. (Nashik Demand action against MSEDCL)

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावली असता, शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातो. तर वादळी पावसाने काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली तर काही ठिकाणी त्यामुळे विजांच्या तारा तुटल्या. यामुळे विजेचा पुरवठा खंडित होतो.

त्यामुळे, पावसाळ्याच्या तोंडावर वीज महावितरण कंपनीकडून वीजतारांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणी मोहीम गेल्या आठवडाभरापासून सुरू करण्यात आलेली आहे. कामटवाडा शिवारातील माऊली लॉन्स, खुटवडनगर या उपनगरीय परिसरात वीज कंपनीकडून गेल्या दोन दिवसात शेकडो झाडांची छाटणी केली गेली.

परंतु छाटणी करीत असताना वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटल्या परंतु त्याचवेळी बहुतांशी झाडांच्या सार्याच फांद्या छाटण्यात आल्या आहेत. माऊली लॉन्स परिसरातील वृंदावननगर येथे असलेल्या उद्यानाच्या बाहेरील तीन झाडांची तर जवळपास कत्तलची केली आहे. (latest marathi news)

झाडाला एकही फांदी ठेवली नाही. त्याचवेळी उद्यानातील दोन झाडांची तर बुंद्यापासूनच तोडून टाकले आहे. याबाबत नागरिकांनी जाब विचारला असता, वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ती झाडे धोकादायक असल्याचे सांगितले. यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कारवाई होणार का?

शहरातील बहुतांशी झाडाच्या छाटणीच्या नावाखाली वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अक्षरश: कत्तल केली आहे. यासंदर्भात शहरातील पर्यावरणप्रेमींकडून आवाज उठविलेला नाही. तसेच, महापालिकेच्या संबंधित विभागाकडून याबाबत कारवाई होणार का, असाही सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT