Tribal students could not get books writing materials from school esakal
नाशिक

Nashik News : जि. प.च्या विद्यार्थ्यांना गणवेश, आदिवासींना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

Nashik News : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके मिळावीत, असा शासन आदेश आहे. मात्र, गत अनेक वर्षांपासून या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेचे विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील चार हजार २३८ शाळांमधील चार लाख ९३ हजार ८८६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळाली असली, तरी त्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले. दुसरीकडे आदिवासी विभागांतर्गत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले. या विद्यार्थ्यांना वह्या, लेखनसाहित्य मात्र मिळू शकलेले नाही. (Tribal students could not get books writing materials from school)

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके मिळावीत, असा शासन आदेश आहे. मात्र, गत अनेक वर्षांपासून या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. कधी गणवेश मिळतो; तर कधी पुस्तके मिळतात. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत यंदा पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी मिळतील, यादृष्टीने शिक्षण विभागाने १५ दिवसांपासून नियोजन केले होते.

प्रथम ही पुस्तके तालुका पातळीवर व नंतर ती शाळास्तरावर पाठविण्यात आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अंशतः अनुदानित, पूर्णतः अनुदानित शाळा, आदिवासी विकास विभाग संचालित व अनुदानित आश्रमशाळा, समाजकल्याण विभाग संचालित व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली.

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत, यासाठी तीन टप्प्यांत पुस्तकांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. पाठ्यपुस्तके मिळाली असली, तरी विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप केले जात होते. (latest marathi news)

यंदा मात्र शासनाने बचत गटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला. शासनामार्फत बचत गटांना कापड देऊन त्यांच्याकडून शिलाई करून घेतली जाणार होती. मात्र, शाळा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी यात बदल करीत थेट गणवेश शिलाई करून देणार असल्याचे शासनाने सांगितले. मात्र, शाळेचा पहिला दिवस उजाडला, तरी गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा कायम आहे.

आदिवासी विद्यार्थी वह्या, लेखनसाहित्यापासून वंचित

आदिवासी विकास विभागाने यंदा ठेकेदारीला धुडकावत थेट गणवेश शिलाई करून घेत विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी वाटप केले. तब्बल २१ वर्षांनंतर विद्यार्थ्यांना या निमित्ताने पहिल्या दिवशी गणवेश मिळाले. गणवेश देण्यात विभागाला यश आले असले, तरी विद्यार्थ्यांना वह्या, लेखनसाहित्य मात्र मिळाले नाही.

विभागाने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या ३० कोटींच्या वह्या खरेदीचा मार्ग खुला झाला असून, आदिवासी विकास आयुक्तालयाने वह्या खरेदीचे कार्यारंभ आदेश पात्र पुरवठादारास दिलेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात वह्यांचा पुरवठा होऊ शकला नाही.

येत्या आठ दिवसांत हा पुरवठा होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. वह्या १५ दिवसांत मिळतील; परंतु लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य मिळण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे. लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदीची १२.५४ कोटींची निविदा विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे.

लेखनसाहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदीला अद्याप मंत्रालयातून वित्तीय सहमती मिळालेली नाही. ही सहमती आचारसंहिता संपल्यावर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावर तोडगा म्हणून आदिवासी आयुक्तालयाकडून निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेण्याची तयारी केली, तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. परंतु, त्यास मान्यता मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT