crime  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : बनावट सिमकार्ड व आधारकार्ड बनवून फसविणाऱ्या दोघांना अटक

Fraud Crime : सिम कार्ड शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक करतानाच, टी २० सामन्यावर ऑनलाईन जुगार,सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : बनावट आधारकार्ड करून त्या आधारे मोबाईल सिम कार्ड शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक करतानाच, टी २० सामन्यावर ऑनलाईन जुगार,सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. भव्य चैतन्य दवे (वय २५, अमिशा अपार्टमेंट,ए वींग,३०३, अँलमरोड, शगुन हाँटेल जवळ, दहिसर मुंबई, आणि जतिन नविन सहा (वय ४१, मीत आर्केड,रूम नं.३०२,सिव्हील हाँस्पीटल जवळ,धोबी अली,चरई,ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत. ( Two arrested for cheating by making fake SIM card and Aadhaar card )

या दोघांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करून त्यांचे बनावट नावाने आधारकार्ड बनवून हाँटेल हब मध्ये ते त्यांचे खरे नाव असल्याचे भासवून खोटे सांगून सदर फूड हब लॉजिंग मधील रूम बुक केली त्या रुममधून त्यांच्या जवळील मोबाईलद्वारे वेगवेगळया आय.डी.व्दारे इतर बुकींसोबत सध्या सुरू असलेल्या सन रायजर्स हैद्राबाद विरूध्द राजस्थान रॉयल्स आय.पी.एल.टी.२०सामन्यावर ऑनलाइन जुगार,सट्टा खेळण्याच्या आरोपावरून नाशिक ग्रामिण पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.

शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास हॉटेल फूड हब लाँजिंग बोर्डिंग येथे त्यांच्याकडे सापडलेल्या मोबाईल फोन व सिमकार्ड हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे असून सिमकार्ड व आधारकार्ड हे दवे व सहा यांनी बनावट तयार करून त्यांनी फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गणेश शिंदे हे करीत आहे

स्थानिक पोलिस अनभिज्ञ

ओझर सारख्या ग्रामीण भागात सर्रास सट्टा बिनदिक्कत चालत असताना याविषयी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार यांनी कारवाई करीत दोन संशयितांना अटक केली सट्टा चालविणारे संशयित याविषयी स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याने या प्रकारा बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT