An accident involving a luxury bus and a truck at Vani Chauphuli esakal
नाशिक

Nashik Accident News : ट्रक, बसच्या अपघातात दोन ठार! वणी चौफुलीवर गुरुवारी पहाटे चारची घटना

Latest Accident News : दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने ही धडक एवढी जोरात होती की, ट्रक पलटी झाला. बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत मुंबई-आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीच्या उड्डाणपुलाजवळ गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास खासगी लक्झरी बस आणि ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. (Two killed in truck bus accident)

पिंपळगाव बसवंत येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांदवडच्या दिशेने पिंपळगाव कडे येत असताना खासगी लक्झरी बस (एआर १ आर ००२७ ) आणि पिंपळगाव कडून चांदवडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ( एमएच एच ०४ एफ जे ६८८७) यांच्यात जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने ही धडक एवढी जोरात होती की, ट्रक पलटी झाला. बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

अपघातात ट्रक मधील वाहक अबुजफर रफिक अहमद (वय २३, मालेगाव) याचा जागेवर मृत्यू झाला. तर लक्झरी बसचा चालक अजमेरी युसूफ शहामला जखमी झाल्याने त्याला नाशिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .मात्र उपचारादरम्यान मृत्यू त्याचा झाला. (latest marathi news)

पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी कोंडी दूर केली. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बागूल, पोलिस नाईक गुंजाळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आवारे तपास करीत आहे.

कॉक्रीटकरणामुळे अपघात

पिंपळगाव बसवंत ते शिरवाडे वणीपर्यंत महामार्गाचे कॉक्रीटिकरण सुरू आहे. त्यामुळे वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. वाहतूक मार्गात बदल करताना आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT