Unseasonal Rain Damage esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage : वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्री शेड उध्वस्त; 400 कोंबड्या मृत्युमुखी

Nashik News : गुरुवार (ता.१६) रोजी सकाळपासून उकाड्याने नागरिक हैरान झाले होते दरम्यान दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट व पावसाने जोरदार हजेरी लावली.

- दीपक खैरनार

अंबासन, (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील वायगाव येथे दुपारच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्री शेड उध्वस्त होऊन चारशे कोंबड्या मृत्युमुखी पावल्या तर अंबासन येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले होते. (Nashik Unseasonal Rain Damage vaygaon news)

गुरुवार (ता.१६) रोजी सकाळपासून उकाड्याने नागरिक हैरान झाले होते दरम्यान दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट व पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबासन येथील ढोबले शिवारातील युवा शेतकरी प्रवीण भगवान अहिरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाचे नुकसान झाले.

विजेच्या आवाजाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तसेच वायगाव, नामपुर रस्त्यावरील पोल्ट्रीधारक शेतकरी मोठाभाऊ रामदास अहिरे यांच्या शेतातील (गट क्रमांक १६१) मध्ये वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्री शेडच्या भिंती कोसळल्या यामुळे चारशे कोंबड्या मृत्यूमुखी पावल्या आहेत. (Latest marathi news)

श्री. अहिरे यांनी बँकेचे कर्ज तसेच हात उसणवार घेऊन मोठ्या हिमतीने पोल्ट्री व्यवसाय उभा केला होता. मात्र वादळी वाऱ्यामुळे मोठाभाऊ अहिरे यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सरपंच अशोक अहिरे यांनी भेट दिली व महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. तलाठी कल्पेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.

"महसूल विभागाने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तात्काळ वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पोल्ट्रीधारक शेतकरी मोठाभाऊ अहिरे यांना मदत करावी. शेतकऱ्यास न्याय मिळावा एवढी अपेक्षा."- अशोक अहिरे, सरपंच वायगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

MS Dhoni Pension : सहा वर्षांपूर्वी निवृत्ती, IPL मध्ये अजूनही खेळतोय महेंद्रसिंग धोनी! भारताच्या माजी कर्णधाराला पेन्शन किती?

SCROLL FOR NEXT