Chintaman Ghangle's house damaged due to storm & Chandrakant Gavit's mango damaged. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: सुरगाणा तालुक्यात अवकाळीचा तडाखा! घरांवरील पत्रे, कौल उडाली; आंबा बागांचे नुकसान

Nashik News : झगडपाडा येथील चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडाले. काहींच्या घरावरील कौलांचे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा : तालुक्यातील आंबुपाडा, बेडसे, ठाणगाव गुरूटेंभी, झगडपाडा, खोकरविहीर, कोडीपाडा, हस्ते, जाहुले या गावांना सोमवारी (ता. १५) दुपारी तीन ते सव्वातीनच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह अवकाळी पावसाने एक ते दीड तास हजेरी लावली. यात काही घरांसह आंबा बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झगडपाडा येथील चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडाले. काहींच्या घरावरील कौलांचे नुकसान झाले आहे. (Nashik Unseasonal Rain Damage Surgana taluka)

तुळशीराम जाधव, युवराज घांगळे , हिरामण महाले यांच्या घराचे नुकसान झाले, तर झगडपाडा येथील शेतकरी प्रकाश घांगळे, देवराम राऊत, जयराम घांगळे, हिरामण महाले, कोडीपाडा येथील शेतकरी कांतिलाल गावित, राकेश मौळे, विठ्ठल गावित, वसंत गवळी, हिरामण गावित, पांडुरंग गावित, जाणू चौधरी, हंसराज महाले, जनार्दन गावित, चंद्रकांत गावित, तर आंबुपाडा येथील यशवंत वाघमारे, जगदीश पवार, दत्तू वाघमारे, सीताबाई हाडळ, आंबू डगळे यांच्या आंबा बागेचे नुकसान झाले आहे. पुंजा मिरगे, सुकर वार्डे यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर शेतकऱ्यांच्या आंबा बागेचे नुकसान झाले आहे.  (latest marathi news)

"कोडीपाडा गावातील शेतात ३५ ते ४० केशर, हापूस, राजापुरी आंबे आहेत. मला दरवर्षी ९० हजार ते सव्वा लाखाचे उत्पन्न मिळत होते. या वर्षी अवकाळी पावसासह चक्रीवादळ झाल्याने खूप नुकसान झाले आहे. त्याचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी."

-चंद्रकांत गावित, शेतकरी, कोडीपाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT