Collector Jalal Sharma, District Magistrate Babasaheb Gadve, Tehsildar Aba Mahajan while inspecting damaged agriculture in Somthan Desh village. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: येवल्याच्या उत्तर भागात कोट्यवधीचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा

येवला : तालुक्याच्या उत्तर भागात रविवारी (ता. २६) सायंकाळी व रात्रभर कातरणी, आडगाव रेपाळ, विसापूर, पाटोदा परिसरात वादळ, गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला.

यामुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चाराही भिजल्याने चाऱ्याचा प्रश्नही उभा राहणार आहे.

सोमवारी (ता. २७) सकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादूर्भाव झाला आहे. जिल्हाधिकारी जलाल शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. (Nashik Unseasonal Rain Damage worth crores in northern areas of Yeola District collector inspecte)

अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी सुरू केल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली. कातरणी येथील किरण नवले यांचा काढणीला आलेला तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे.

सोमठाण देश, कातरणी, आडगाव रेपाळ, विसापूर, पाटोदा, अनकाई, कानडी, गुजरखेडे परिसरात वादळी वारा व गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी गारांच्या माऱ्याने द्राक्ष घड गळून पडले आहेत.

काढलेला कांदा ओला झाल्याने, तसेच गारांमुळे कांदपात गळून पडली आहे. कांद्याच्या पोंग्यात पाणी गेल्याने जमिनीतील कांदा जमिनीतच सडून जाणार आहे. सोमठाण देश येथील चंद्रभान पिंपळे यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे.

समाधान वाघ, कृष्णा गाडे, देविदास काळे, चांगदेव गाडे, कातरणी येथील भागीनाथ नवले, आप्पासाहेब सोनवणे, संदीप कदम, तुकाराम कोल्हे, अंबादास सोनवणे, आत्माराम वैराळ, पंढरीनाथ कदम, किरण नवले, चंद्रकात गांगुर्डे, भावराव सोनवणे, कैलास कदम, ज्ञानेश्वर कदम, रवींद्र कदम, राम कदम, संजय वैराळ, निवृत्ती कदम, राजाराम नवले, राजाराम वैराळ, सोमनाथ कदम यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

तालुक्यातील सोमठाण देश, कातरणी, निळखेडे गावात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबाग व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन यांनी झालेले नुकसानीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT